यवतमाळ :- डाक विभागाच्यावतीने दि.4 डिसेंबर रोजी पीएलआय अर्थात पोस्टल लाईफ इन्शुरन्स, डाक जीवन विमा आणि आरपीएलआय अर्थात ग्रामीण पोस्टल लाईफ इन्शुरन्स, ग्रामीण डाक जीवन विमा यासाठी विशेष जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यात ही मोहीम प्रभावीपणे राबवण्यात येणार असून, डाक विभागातील सर्व कर्मचारी आणि अधिकारी या मोहिमेत सक्रिय सहभागी होणार आहे.
या मोहिमेद्वारे नागरिकांना डाक विभागाच्या जीवन विमा योजनांची सविस्तर माहिती दिली जाणार आहे. नागरिकांना डाक जीवन विमा व ग्रामीण डाक जीवन योजनांचा लाभ मिळवून देणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. डाक विभागाच्या या योजनेत वाजवी प्रीमियममध्ये जीवन विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे या योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने पुढाकार घेणे आवश्यक आहे.
विशेष जन जागृती मोहिमेच्या यशस्वी आयोजनासाठी यवतमाळ विभागात दि.4 डिसेंबर रोजी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. योजनांच्या जनजागृतीसाठी सर्व पोस्ट कार्यालयांनी आपापल्या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचावे आणि विमा नोंदणी प्रक्रियेला गती द्यावी. असे निर्देश देण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी जवळच्या पोस्ट ऑफिसला भेट द्यावी, असे अधीक्षक गजेंद्र जाधव यांनी कळविले आहे.