कलाकारांवरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्याबाबत सकारात्मक – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई :- चित्रपट उद्योगामध्ये काम करणारे कलाकार, सह-कलाकार, नायक, सह-नायक यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी विशेष न्यायाधिकरण स्थापण्यासंदर्भात विधी व न्याय विभागाकडे विचारणा करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले.

चित्रपट क्षेत्रात लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर होत असलेल्या अन्यायाबद्दल सिने टी. व्ही. असोशिएशनचे पदाधिकारी मनोज जोशी, जॉनी लिव्हर, बिंदू दारासिंग, संजय पांडे, उपासना सिंग यांनी मंत्रालयात कामगार मंत्री श्री.फुंडकर यांची भेट घेतली. यावेळी कामगार विभागाचे उपसचिव स्वप्नील कापडणीस, उपसचिव दिपक पोकळे उपस्थित होते.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले की, लहान भूमिका करणाऱ्या कलाकारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय सहन केला जाणार नाही. कलाकारांवर कंत्राटदार किंवा निर्मात्यांकडून अन्याय झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितावर कठोर कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर या कलाकारांना वेळेत वेतन मिळावे, यासाठी नियमावली तयार करण्यात येणार असून तो लवकरच केंद्रीय कामगार मंत्रालयाकडे पाठविण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

भालेराव महाविद्यालयाचे रा. से. यो. शिबीर संपन्न

Wed Jan 29 , 2025
सावनेर :- रा. तू. म. नागपूर विद्यापीठ संलग्नीत स्थानिक भालेराव विज्ञान महाविद्यालयातर्फे नुकतेच ग्रामपंचायत सावंगी (हेटी) येथे सात दिवसीय निवासी विशेष श्रमसंस्कार शिबीर घेण्यात आले. भारताकरिता आणि डिजिटल साक्षरतेसाठी युवा या संकल्पनेवर आधारित अनेक सामाजिक आणि देशभक्तीपर उपक्रम राबविण्यात आले. शिबिराच्या उदघाटन समारंभाचे अध्यक्षस्थान विजयसिंग सावजी यांनी भूषविले तर डॉ. राकेश कभे, जिल्हा समन्वयक, राष्ट्रीय सेवा योजना रा. तू. म. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!