संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– पुण्यस्मूर्ती व उत्सवानिमित्त विविध स्पर्धा
– पालखी व अखाडा मिरवणुकीचा हरदास घाट कन्हान येथे समारोप
कामठी :- जयभीम प्रवर्तक लोकप्रिय बाबू हरदास एल एन यांनी विषम परिस्थितीत संघर्षमय राहून समाजाची निस्वार्थ सेवा करण्याची सदोदित प्रेरणा दिली तर कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे हे कष्टकरी कामगारांच्या हक्काचे पुरस्कर्ते होते असे गौरवोद्गार पुज्यनिय भदंत नागदीपंकर यांनी व्यक्त केले. त्या लोकप्रिय बाबू हरदास एल एन व कर्मविर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यस्मूर्ती उत्सवा निमित्त हरदास घाट कन्हान येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात बोलत होते.
दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा लोकप्रिय बाबु हरदास एल एन व कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या पुण्यसमूर्ती उत्सवा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .या पुण्स्मूर्ती उत्सवानिमित्त आंतरशालेय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते तसेच हरदास व्यायाम शाळा पटांगण हरदास नगर येथे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले तर आज 15 जानेवारीला सकाळी 11 वाजता हरदास नगर येथुन पालखी व अखाडा मिरवणूक काढण्यात आले होते.या मिरवणुकीचा शुभारंभ ऍड सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते मोटर स्टँड चौक स्थित बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला तसेच कर्मवीर ऍड दादासाहेब कुंभारे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन वाहुन करण्यात आली.
याप्रसंगी समता सैनिक दलाच्या वतीने तसेच सहभागी अखाडा संघ्याच्या वतीने मानवंदना वाहून सलामी देण्यात आली.तदनंतर जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले.ही मिरवणूक शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत कन्हान येथील हरदास घाट येथे पोहोचविण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाचे शिस्तबद्ध पथसंचलन,हरदास विद्यालयाचे विद्यार्थ्यांनी लेझीम पथकाद्वारे प्रात्यक्षिके सादर करण्यात आले होते. तसेच या पालखि मिरवणुकीत हरदास विद्यालय कामठी, ड्रॅगन इंटरनॅशनल स्कुल कामठी, हरदास उच्च प्रथमिक शाळा , दादासाहेब कुंभारे विद्यालय नेरी, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षण संस्था, हरदास नगर बौद्ध विहारातील लेझीम पथक, जयभीम चौकातील प्रशिक अखाडा, नयाबाजार चा अखाडा संघ, हरदास व्यायाम शाळा, दादासाहेब कुंभारे व्यायाम शाळा , ऍड दादासाहेब कुंभारे अखाडा, बिडी कामगार कुंभारे कॉलोनी कामठी, देवाजी वस्ताद का अखाडा, हरदास वाचनालय व ऍड दादासाहेब कुंभारे जिम , भारतोय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, सार्वजनिक भीम स्मूर्ती मंडळ, निर्धार महिला व बाल विकास समितो, दादासाहेब कुंभारे बिडी उत्पादक मजदूर सह संस्था,प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट कामठी तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौंदर्यीकरण समिती क्षमठिब इत्यादींचा सहभाग होता.
श्रध्दांजलीचा मुख्य समारंभ व पालखि समारोप कार्यक्रम हरदास घाट कन्हान येथे ऍड सुलेखा कुंभारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक पूज्य भन्ते नागदीपणकर यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष प्रमोद उर्फ गुड्डू मानवटकर, रितेश यादव,सोमेशकुमार जेटली,अरविंद उके,प्रमोद खोब्रागडे, राजेश गजभिये, नागसेन सुखदेवें,महेंद्र मेंढे,कोमल लेंढारे, भिक्कु मेंढे,सुनील चव्हाण,एस सहारे, खुशाल कराडे, शुद्धोधन पाटील,अनिल बेंदले,आशिष मेश्राम,उदास बन्सोड, मनोज रंगारी,रायभान गजभिये,गीतेश सुखदेवें, विकास रंगारी, सुभाष सोमकुवर,मंगेश खांडेकर,राजन मेश्राम,नितु दुबे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.