नागपूर :-हिंदू विद्या भवन, शांतीनिकेतन, हनुमान नगर, नागपूर येथे श्री दत्त जयंती निमित्य पूजा थाळी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. शाळेतील मुलांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभाग घेतला. संस्थेच्या विश्वस्त महालक्ष्मी जोशी यांनी दत्त गुरूंच्या फोटोला माल्यार्पण केले व सजावट थाळीचे निरीक्षण करून लहान मुलांचे कौतुक केले. थाळी सजावटीमध्ये मुलांना प्राविण्य देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शाळेच्या मुख्याध्यापिका दिपीका वाठ, शिक्षकांमध्ये रितेश पंडेल, शिल्पा मंजुेवार, उज्वला राऊत, केतकी नागरीकर, तेजस्विनी पंचबुधे, कोमल फिस्के, शैला कुकडे, रेणुका वर्मा, आदर्श चोपकर, मनिषा मराठे, रूपाली ढोरे, पूजा बावने, अंशिता मनपिया, गायत्री ठाकरे, ॠतूजा जिवने, जयश्री कसरे, प्रिती जांभूळकर, श्वेता नवरे, मंजुश्री आटे आदिंनी विशेष प्रयत्न केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.