नागपूर- निर्मल अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि. नागपूरच्या अध्यक्षपदी पूजा प्रमोद मानमोड यांची बिनविरोध निवड झाली. त्यांची ही निवड २२-२३ ते २७-२८ या आर्थिक वर्षांकरिता झाली आहे.
महराष्ट्र राज्य सहकारी निवडणूक आयुक्त, पुणे आणि जिल्हा सहकारी निवडणूक अधिकारी नागपूर यांनी बँकेच्या व्यवस्थापन मंडळाची निवडणूक जाहीर केली. निवडणूक अधिकारी राजेंद्र वासू (सहाय्यक उपनिबंधक रामटेक)यांनी निवडणूक प्रक्रिया पार पाडली. यामध्ये सदस्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी राजेंद्र वासू (सहाय्यक उपनिबंधक रामटेक)यांनी ३१ जानेवारी २०२३ ला निवडून आलेल्या सदस्यांची घोषणा केली.
निर्मल अर्बन को-ऑपरेटीव्ह बँक लि.ची ३१ जानेवारी २०२३ च्या बैठक बोलावण्यात आली होती. त्यात पूजा प्रमोद मानमोडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तर तुकाराम नरसिंह चव्हाण यांची उपाध्यक्ष बिनविरोध निवड झाली. त्याची ही निवड पाच वर्षांकरिता आहे. तसेच बँकेच्या मंडळावर निर्मला प्रमोद मानमोडे, सीए मनिष अशोक शुक्ला (प्रोफेशनल डायरेक्टर), नंदा दिनेश बांते, किशोर हिरामण कडू, प्रतिमा राजकुमार खाडे, उमाजी केशवराव कोहळे, रंगराव महादेवराव गेचोडे, देवेंद्र वासुदेवराव घारपांडे, मनोज धनराज धकाते, मुकुंद वासुदेराव पांढरे, धनराज बालाजी धकाते, तेंजुषा गणेशराव नाखले, गणेश रामकृष्ण नाखले यांची सदस्यपदी निवड झाली आहे.
बँकेचे संस्थापक प्रमोद नत्थु मानमोडे यांनी नवनियुक्त मंडळ सदस्यांचे अभिनंदन केले आणि या मंडळाच्या मार्गदर्शनाखाली बँकेची उत्तरोत्तर प्रगती होईल असा विश्वास व्यक्त केला. मंडळ सदस्यांनी निवडणूक अधिकारी राजेंद्र वासू (सहायक उपनिबंधक रामटेक)यांचे चांगल्या प्रकारे निवडणूक पार पाडल्याबद्दल आभार मानले. अकाऊंट मॅनेजर शितल गजभिये, एजीएम नरसिंग यादव यांनी सदस्यांची बैठक बोलावली आणि अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या निवडीची तसेच संचालक मंडळाची घोषणा केली. तर उपमुख्यकार्यकारी अधिकारी विजयकुमार मूर्ती आभार व्यक्त केले.