रामटेक तालुक्यात मतदान शांततेत

– तालुक्यातील ८ ग्रामपंचायतमध्ये होती निवडणुक

रामटेक :- तालुक्यातील ८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली . तालुक्यात सकाळी ९ वाजता मतदान प्रक्रियेला सुरवात झाली . सकाळी पाहिजे त्या प्रमाणात मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली नाही . सकाळी ११.३० वाजता पर्यंत २१.३२ % मतदान झाले होते . दुपारनंतर मात्र मतदानाची गती मंदावली . दुपारी १.३० वाजता ३८.६३ टक्के मतदान झाले . त्यानंतर मतदानाने गती पकडली त्यानुसार दुपारी ३.३० वाजता ५७.८९ टक्के मतदान झाले होते . मतदानादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडली नाही. निवडणूक निर्णय अधिकारी तसेच रामटेक पोलिसांनी मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवला होता.

संपुर्ण आठही ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान एकुण मतदान ७२.९० % एवढे झाले. त्यामध्ये आज मी येथे १२५७ मतदारांपैकी एकूण १०८८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला येथे ८८.६७ % मतदान झाले. तर आसोली येथे ५७६ मतदारांपैकी ४८१ मतदारांनी मतदान केले. येथे ८३.५१ % मतदान झाले. नगरधन येथे ६१७३ मतदारांपैकी ४७२३ मतदारांनी मतदान केले. येथे ७६.५१ % मतदान झाले. मुसेवाडी येथे ९०६ मतदारांपैकी ७११ नागरीकांनी मतदानाचा हक्क बजाविला. येथे ७८.४८ % मतदान झाले. भिलवाडा येथे ७६७ मतदारांपैकी ६५० नागरीकांनी मतदान केले. येथे ८४.७५ % मतदान झाले. हिवरा हिवरी येथे ८१८ मतदारांपैकी ६४३ नागरीकांनी मतदान केले. येथे ७८.६१ % मतदान झाले. पटगोवारी येथे २६१६ मतदारांपैकी १८७२ नागरीकांनी मतदान केले. येथे ७१.५६ % मतदान झाले. मनसर येथे ५९०५ मतदारांपैकी ३६७४ नागरीकांनी मतदान केले. येथे ६२.२२ % मतदान झाले. असे सर्व ८ ग्रामपंचायत मिळुन एकुण ७२.९० % मतदान झाल्याची माहिती निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी माहीती दिली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महा मेट्रो च्या इतिहासात सर्वात जास्त राइडरशिप @ 1,60,000 (अपेक्षित) काल (१,४७,००४ रात्री 8 वाजेपर्यंत)

Mon Dec 19 , 2022
नागपूर: 11 डिसेंबर रोजी महा मेट्रोच्या दोन लाईनचे उद्घाटन झाल्यानंतर अवघ्या एका आठवड्यानंतर, महा मेट्रोने आणखी एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. (रविवारी) महा मेट्रो ची रायडरशिप 1,५0,000 (अपेक्षित) आहे. रात्री ८ वाजेपर्यंत मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या १,४७,००४ होती.किंबहुना, उद्घाटनाच्या दिवशी रायडर्स वाढीचा ट्रेंड दिसून आला. उद्घाटनाच्या दिवशी म्हणजे ११ डिसेंबर रोजी रायडरशिप 79,701 होती. महत्वाचे म्हणजे 11 डिसेंबर रोजी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!