गटारगंगेतली राजनीती, रामदास सांगे गजाननाची अपकीर्ती 

राज्याच्या राजकीय वर्तुळातले या दिवसात दरदिवशी जे बहुसंख्य पुरावे कानावर पडतात किंवा लेखी जमा होतात, बघून मन बधिर आणि अस्थिर होते. सतीश लोखंडे या प्रशासकीय अधिकाऱ्याच्या निवृत्तीनंतर त्याजागी एसआरए मध्ये पोस्टिंग मिळविण्यासाठी आजतागायत शासकीय प्रशासकीय नोकरीत केवळ स्वतःच्या कुटुंबाचे ” कल्याण ” करणाऱ्या कायम आर्थिक धुमाकूळ घालणार्या शौकीन वादग्रस्त बिनधास्त बेताल आणि कायम क्रीम पोस्ट्स मिळविणारा प्रशासकीय सेवेतील एक खिलाडू ” महेंद्रसिंग ” धोनी याने तब्बल 30 कोटी रुपये केवळ टोकन म्हणून ठाण्यातल्या एका मोठ्या राजकीय दलालाला मोजले आहेत उर्वरित 70 कोटी पोस्टिंग झाल्यावर, ऐकून पायाखालची वाळू अक्षरश: सरकली, एकाचवेळी क्रीम पोस्टिंग मिळविण्यासाठी तब्बल शंभर कोटी रुपये मोजणाऱ्या या पद्धतीच्या महाभ्रष्टाचारी शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांची खाजगी मालमत्ता केवढी असू शकते हे तो परमेश्वर जाणे, हि बातमी एक अफवा ठरो आणि राज्याचे कल्याण होवो हीच देवाकडे प्रार्थना, नेमके जर ठरल्याप्रमाणे हे पोस्टिंग झालेच तर हे महाशय नेमके कसे नवश्रीमंत मी सिद्ध करून मोकळा होईल…

कोणत्याही चुकीच्या किंवा वाईट कामात स्वतःकडे तीन बोटे असणाऱ्या माजी मंत्री रामदास कदम यांनी त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे शिंदे शिवसेनेच्या बुजुर्ग नेत्याची खासदार गजानन कीर्तिकर यांची तिसरी बायको काढली तेव्हा कीर्तिकारांना जवळून ओळखणार्या किंवा सतत जवळून बघणार्या एकालाही कदमांच्या या आरोपावर अजिबात आश्चर्य वाटलेले नाही, फारतर जे राजकारणापासून दूर आहेत असतात त्यांनी मात्र, राजकारणाचा स्तर किती खालच्या पातळीवर येऊन पोहोचलाय हे कदम आणि कीर्तिकर या दोघांकडेही बोट दाखवत अशी खंत एकमेकांकडे नक्की व्यक्त केली. नेत्यांच्या अधिकाऱ्यांच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक बायका, असा विषय जर मी घेतला तर संजय राठोड संजय शिरसाट पासून तर दत्ता मेघे किंवा भय्यू महाराजांपर्यंत मला त्यावर अगदी पुराव्यांसहित एक कांदबरी लिहिता येईल. राजकारणात किंवा सरकारी नोकरीत क्वचित खचित राजेंद्र पटणी किंवा अनंत गाडगीळ, बहुतेकांनी बायका ठेवून किंवा एकापेक्षा अधिक विवाह उरकून स्वतःचा ” गोपीनाथ मुंडे ” करवून घेतलेला आहे. आज बेताल रामदास कदमांनी गजानन कीर्तिकारांचे लफडे बाहेर काढले उद्या आपलेही बाहेर निघेल या भीतीने म्हणे पवार घराण्यातले पुतणे हादरले वर्षावरले वातावरण तापले आणि राज्यातल्या अनेक असंख्य बहुसंख्य नेत्यांचे धाबे दणाणले….

अपघात घडला कि घडवून आणल्या गेला हे नेमके गजानन कीर्तिकर सांगू शकतील पण कर्तबगार अमोल आणि हर्षदा यांची आई आणि कीर्तिकारांची पहिली पत्नी विचित्र पद्धतीने स्वर्गलोकी गेल्यानंतर कीर्तिकारांचा नाही म्हणायला बाहेर मजेत मस्त वेळ जात होता पण घरात अमोल आणि हर्षदा मात्र एकटे पडले होते त्यातून प्रेम जुळून आलेल्या मंत्रालयात नोकरी करणाऱ्या एका तरुणीशी शिवसेना नेते गजानन कीर्तिकारांनी रीतसर लग्न केले, दोन्ही मुलांना म्हणजे अमोल आणि हर्षदाला प्रेमळ आई मिळाली, गजाभाउंना दुसर्या पत्नी पासून गौरी झाली, नवख्यांना ओळखणे अशक्य एवढे आजही अमोल आणि हर्षदा आपल्या या सावत्र आईवर मनापासून प्रेम करतात आणि गौरीच्या आईने देखील त्या दोघांना सख्ख्या आईपेक्षा अधिक माया लावली आईची सावली दिली, आजही ते सारे गोरेगावच्या स्नेहदीप इमारतीमध्ये पाचव्या माळ्यावर एकत्र राहतात, आता तर अमोल देखील एका मुलाचा बाप आहे, विशेष म्हणजे अमोल हे उद्धव सेनेचे उपनेते आणि गजाभाऊ शिंदे सेनेचे पण त्या दोघांच्याही केबिन्स स्नेहदीप इमारतीत दुसर्या माळ्यावर एकमेकांच्या शेजारी आहेत म्हणजे दोन सवतींनी एकाच पलंगावर झोपावे त्यातला हा प्रकार, अर्थात जो आरोप रामदास कदम यांनी कीर्तिकारांवर केला त्यावर कधीकाळी अमोल कीर्तिकर अस्वस्थ दुख्खी झाले होते त्यांनी पुढे कित्येक दिवस गजाभाऊंशी आपल्या बापाशी अबोला धरला होता, हळूहळू वातावरण निवळले आणि गजाभाऊंचे तिसरे लफडे देखील बिनबोभाट नेहमीप्रमाणे निभावले, जे खूप वर्षांनी जुनी खुन्नस ठेवणार्या म्हणजे कांदिवलीच्या जमिनीवरून एकमेकांपासून दूर गेलेल्या रामदास कदम यांनी मोका साधून आपल्याच पक्षाच्या एका मोठ्या नेत्याला म्हणजे गजानन कीर्तिकर यांना बदनाम करून मुख्यमंत्री व त्यांच्या पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांना नव्याने डोकेदुखी निर्माण करून ठेवली….

अपूर्ण…

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज शाम 'ज्योत से ज्योत जलाते चलो' कार्यक्रम

Sat Nov 25 , 2023
– कार्यक्रम में सुरभि ढोमने,सचिन ढोमने और डॉक्टर मनोज सालपेकर समा बांधेंगे नागपुर :- भारत जोड़ो अभियान से प्रेरित होकर कवि प्रदीप फाउंडेशन नागपुर ने ‘ ज्योत से ज्योत जलाते चलो’ कार्यक्रम का आयोजन किया है। इस सुर-संगम कार्यक्रम का आयोजन वसंतराव नाईक स्मृति सभागृह,वनामती,वीआईपी रोड नागपुर में आज 25 नवंबर 2023 की शाम 6.30 बजे किया गया है।https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 इस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com