शिंदे, एकनाथ संभाजी

जन्म : ६ मार्च १९६४.

जन्म ठिकाण : अहिर, तालुका – महाबळेश्वर, जिल्हा – सातारा.

शिक्षण : बी.ए.

ज्ञातभाषा : मराठी, हिंदी व इंग्रजी.

वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती लता.

अपत्ये : एकूण १ (एक मुलगा).

व्यवसाय : उद्योग व सामाजिक कार्य

पक्ष : शिवसेना

मतदार संघ : १४७ – कोपरी – पाचपाखाडी, जिल्हा – ठाणे.

इतर माहिती :

ठाणे येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष, सन १९८६ मध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न आंदोलनात १०० कार्यकर्त्यांसह सक्रीय सहभाग, ४० दिवस बेल्लारी येथे तुरुंगवास सहन केला, संपूर्ण ठाणे शहर व जिल्ह्यात सामाजिक कार्याचे जाळे निर्माण केले; ठाणे शहरात ओपन आर्ट गॅलरी, सचिन तेंडुलकर मिनी स्टेडियम, इंटरनिटी सुविधा भूखंडावर बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक, शहिद हेमंत करकरे क्रीडा संकूल, जॉगिंग पार्क, सेंट्रल लायब्ररी सुरु केली;

आदिवासी प्रभाग मोखाडा, तलासरी व जव्हार येथील आश्रम शाळेत व आरोग्य केंद्रात सकस आहार व आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन करुन गरीब रुग्णांना विनामुल्य औषध वाटप केले; पालघर, बोईसर व सफाळे परिसरात शिवसेने तर्फे एस.एस.सी. विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमालेचे आयोजन, गरीब विद्यार्थ्यांना शालोपयोगी साहित्यांचे वाटप, पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, वृक्षारोपण, आरोग्य तपासणी शिबीरांचे आयोजन, बाल नाट्य महोत्सवाचे व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, ‘जाणताराजा’ नाटकाचे अत्यल्पदरात आयोजन, अध्यक्ष, ठाणे जिल्हा बॅडमिंटन असोसिएशन; उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य अॅथलेटिक्स संघटना, पूरग्रस्तांना मदत,

ठाणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी व आधुनिकीकरणासाठी विशेष योगदान; एमएमआरडी सक्षम बनविण्यात यश, नागपूर – मुंबई समृध्दी महामार्ग, वांद्रे- वरळी सी लिंक, वाशी येथील तिसरा खाडीपुल, मुंबई – पुणे द्रुतगतीमार्गची क्षमता वाढविण्यासाठी खालपूर- लोणावळा टनेल मार्ग, शिळ – कल्याण रस्त्याचे सहापदरीकरण, विदर्भात रेल्वेच्या २७ उड्डाणपूलाचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न; राज्यातील द्रुतगती मार्गावरील उपधान कमी करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या; ओझर्डे येथे ट्रामा केअर सेंटर सुरू केले; आरोग्य मंत्रीपदाच्या काळात आशा सेविकांची पगार वाढ केली; आदिवासी व दुर्गम भागात काम करणाऱ्या बी.ए.एम.एस. पदवी धारक कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला.

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास केला; ठाणे मेट्रोच्या कामाला गती दिली; ठाणे- मुलुंड दरम्यान नव्या स्थानकाला मंजुरी मिळविली; ठाणे जिल्ह्यासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या काळू धरणाच्या अडचणी सोडविण्यात यश; बारवी धरणाची उंची वाढविण्यासाठी मंजूरी मिळविली; एमएमआरडीला क्लस्टर योजना सुरू केली; ठाणे जिल्हा परिषद, तसेच कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, महानगरपालिकेत व अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेची सत्ता आणण्यात यश; १९८४ शिवसेना शाखा प्रमुख, वागळे इस्टेट, किसननगर; शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख; पक्षाच्या सर्व आंदोलनात सक्रिय सहभाग, १९९७ व २००२ दोन वेळा नगरसेवक, तीन वर्षे स्थायी समिती सदस्य, चार वर्षे सभागृह नेता, महानगरपालिका ठाणे.

२००४-२००९, २००९-२०१४, २०१४-२०१९ २०१९-२०२४ सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; २०१४-२०१९ विधीमंडळ शिवसेना पक्षाचे गट नेते; १२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ विरोधीपक्ष नेता, महाराष्ट्र विधानसभा; ५ डिसेंबर २०१४ ते नोव्हेंबर २०१९ सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री; तसेच जानेवारी २०१९ सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री; डिसेंबर २०१९ पासून शिवसेनेचे गट नेते; नोव्हेंबर २०१९ – जून २०२२ नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री.

३० जून २०२२ रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ. खाती – सामान्य प्रशासन, नगरविकास, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर

नोव्हेंबर २०२४ मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड, दिनांक ५ डिसेंबर २०२४ रोजी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor Radhakrishnan attends Beating Retreat Ceremony on Navy Day

Fri Dec 6 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor C P Radhakrishnan attended the ‘Beating Retreat’ and Tattoo Ceremony organised by the Western Naval Command of Indian Navy on the occasion of Navy Day at Gateway of India in Mumbai on Wed (4 Dec). The impressive event included breath-taking performances by the naval central band, the Beating Retreat Ceremony, helicopter fly-past, Continuity drill by naval […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!