पोलीस स्टेशन हुडकेश्वर मार्फत चाणक्य पुरम परिसरातील नागरिकांसोबत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

नागपूर : चाणक्य पुरम मंदिरामध्ये, पोलीस स्टेशन हुडकेश्वर मार्फत चाणक्य पुरम परिसरातील जनतेसोबत जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सत्यवान कदम, सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सर्व नागरिकांना सुरक्षित कशाप्रकारे राहता येईल व पालकांनी मुलांसोबत मित्रता ठेवण्याची गरज आहे. तसेच या परिसरामध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशनचे नागरिकांनी घ्यावयाची काळजी याबाबद फलक पण लावण्यात आलेले आहे. या फलकावर 100 नंबर 112 नंबर देण्यात आलेला आहे. परिसरातील नागरिकांना जर कुठे संशय असल्यास त्यांनी ताबडतोब या नंबरवर फोन करून संपर्क करावे, व वरिष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच चितरनजनदास चांदोरे, क्राईम पोलीस निरीक्षक यांनी पण नागरिकांशी संवाद साधत वाढत्या गुन्हेगारीला थांबविण्या करिता घरासमोर व परिसरामध्ये कॅमेरा लावण्या बाबत मार्गदर्शन केले. त्याच प्रमाणे मोबाईल वर येणारे फ्रॉड बँकिग, मेसेज,एम एम एस त्यापासून सावध राहण्या करिता पण मार्गदर्शन केले, तसेच अखिल पवार जिल्हा न्यायालय विधी सेवा प्राधिकरण तर्फे यांनी सुद्धा लहान मुलांना मोबाईल वापरत असताना सावधगीरी बाळगण्यास सांगितले  व मुलांना आयपीसी सीआरपीसी संविधान कायदा बद्दल मुलांना माहिती व्हावी याबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे मुख्य उद्देश वाढत्या गुन्हेगारीला कशाप्रकारे कमी करून थांबवता येईल व नागरिकांना कशाप्रकारे  सुरक्षित राहता येईल याबद्दल जनसंवाद कार्यक्रम ठेवण्यात आला होता. कार्यक्रमांचे संचालन गजानन ढबाले, व मंच व्यवस्थापन दिपक वाघमारे व रामेश उईके, आभार प्रदर्शन सौ.नलिनी ताई आंबुलकर यांनी केले. यावेळी परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. दीपक वाघमारे, विजय आंबुलकर, मनोहर सोंकुसरे, रमेश कुंभलकर, विवेकानंद भगत, वसंतराव गिरडकर, दिनकर शनिवारे, गजानन ढबाले, रमेश उईके, हेमराजजी पाटील, पाचपोरेजी, किशोर मसराम, पियुष वाघमारे, भगत, गावंडे, विनोद सलामे, रंगाराव महल्ले, सौ.वर्षाताई भगत, नलिनीताई आंबुलकर, लताताई सोनकुसरे, शोभाताई बोंद्रे, कुंदाताई ढबाले, पुष्पाताई गाडीकर, सुनंदाताई कुंभलकर, वैशाली झाडे, रंगारी ताई, वाघमारे ताई, वनिता वाभीटकर, चंदा झाडे, शालू महल्ले, मेंढेकर ताई, गडीकर ताई व इतर परिसरातील गणमान्य नागरिक या कार्यक्रमाला उपस्थित होते.
दिनेश दमाहे
9370868686
dineshdamahe86@gmail.com
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

BS ISPAT का उद्योग बंद,आवंटन कोयला खदान हो रही कालाबाज़ारी?

Mon Dec 6 , 2021
 – खुले बाजार में मुँह मांगे दामों का बेच रहे अग्रवाल-जैन बंधु,IBM आदि सम्बंधित विभाग की चुप्पी से फलफूल रहा अवैध कृत,केंद्र सरकार को वर्षो से लग रहा चुना  नागपुर/यवतमाळ – केंद्र सरकार उद्योगों को आत्मनिर्भर बनाने के उद्देश्य से उनके मुलभुत अड़चनों को दूर कर सरल व्यवस्था करते जा रही,इस क्रम में कोयले आधारित प्रकल्पों को कोयला खदान भी आवंटन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!