– एक आरोपी अटक, ५० लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- पोलीस स्टेशन अंतर्गत नागपुर- जबलपुर रोडवर टेकाडी शिवारात उपविभागीय पोलीस अधि काऱ्यांनी अवैधरित्या रेतीची वाहतुक करणाऱ्या बारा चाकी टिप्पर ट्रक ला पकडुन एका आरोपीस ताब्यात घेऊन ५० लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
प्राप्त झालेल्या माहिती नुसार मंगळवार (दि.२८) जानेवारी ला सायंकाळी ६.३० वाजता उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड स्टाफ सह कन्हान परिसरात पेट्रोलिंग करित असतांना नागपुर जबलपुर रोडवर टेकाडी शिवारात १२ चक्का टाटा टिप्पर ट्रक एमएच ४० सीडब्लु १७१७ हा मनसर कडुन नागपुर कडे येतांनी दिसला. उपविभागीय पोली स अधिकाऱ्यांनी स्टाफ च्या मदतीने त्यास थांबवुन ट्रकची पाहणी केली असता टिप्पर मध्ये रेती मिळून आली. चालकाला रेती राॅयल्टी बाबत विचारफुस केली असता त्याने राॅयल्टी नसल्याचे सांगितले. चालकास टिप्पर मालकाचे नाव विचारले असता त्याने माहित नसल्याचे सांगितल्याने पोलीसांनी आरोपी चालक शादाब पठान राह. वार्ड क्रमांक ४ जुने पोलीस स्टेशन समोर देवलापार यास ताब्यात घेऊन त्यांचा जवळुन ९ ब्रास रेती किंमत २७,००० रुपये आणि टाटा टिप्पर ट्रक किंमत ५०,००,००० रुपये असा एकुण ५०,२७, ००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोलीस स्टेशन ला सरकार तर्फे फिर्यादी पोहवा राजेंद्र किसन जी मारबते यांचे तक्रारी वरून वरिष्ट पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांचा मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल नरेश श्रावणकर यानी आरोपी शादाब पठाण विरुद्ध अप क्र ६०/२५ कलम ३०३(२), ४९ , ४८(७), ४८(८), ४, २१ , ३ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास कन्हान पोलीस करित आहे.