हॉटेल न्यू सहारा लॉजिंग वर पोलिसांची धाड

– दोन आरोपींना अटक व एक फरार

– चार महिला आढळल्या

रामटेक :- रामटेक तालुक्यात व परिसरात नवीन लॉजिंग बोर्डिंग मोठ्या प्रमाणात सुरू आहे या ठिकाणी आपल्या फायद्या करिता हॉटेल मालक अश्लील कृत्य करण्याकरता पर्यटकाच्या नावाखाली उपलब्ध करून देत आहे यावेळी रूम करता ओळखपत्र न तपासता आलेल्या व्यक्तींना सर्रास रूम उपलब्ध करून अश्लीलतेला वाव मिळत आहे, स्थानिक पोलीस सुद्धा याकडे दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसुन येत आहे .

वर्षाच्या शेवटी पोलिसांनी दिनांक ३१ डिसेंबर च्या सायं. ५.३० वा. दरम्यान हिवरा हिवरी रोड वरील स्थित असलेले हॉटेल न्यू सहारा / लॉजोंग मध्ये धाड टाकली असता येथे हॉटेल मालक हा स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता मुलीना मुंबई , भोपाल म.प्र., बेंगलोर कर्नाटक, दिघोरी नागपुर येथील चार महिलांना पैशाचे अमीष देवुन त्यांना देहव्यापारास प्रवृत्त करून त्यांना हॉटेल न्यू सहारा मध्ये असलेल्या रूमा उपलब्ध करून देवुन त्याचे कडुन देहव्यापार करवुन घेत असल्याचे व त्याचे बदल्यामध्ये देह व्यवसाय करणारे महीलांना प्रति ग्राहकामागे पैसे देऊन अनैतिक देह व्यापार चालवत असल्याचे आढळुन आले. रामटेक पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा नोंद केलेला आहे. पुढील रामटेक पोलीस करीत आहे.

यात्रीनिवास चा अभाव, हॉटेल, लॉजेस दिडशेच्या घरात

धार्मिक स्थळ तथा पर्यटन स्थळ म्हणुन ख्याती असलेले रामटेक हे भारत देशात गाजलेले ठिकाण आहे. येथे देशाच्या कानाकोपऱ्यातुन यात्रेकरूंसह पर्यटक येत असतात तथा सारखी रिघ लागलेली असते. त्याचप्रमाणे याठिकाणी देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद सुद्धा येऊन गेले आहेत. तसेच विविध मोठ मोठे मंत्री, राज्यपाल सुद्धा अधुन मधुन हजेरी लावत असतात. तेव्हा एवढी मोठी पार्श्वभूमी असतांनाही या ठिकाणी गडमंदीर परिसरात एक साधे यात्रीनिवासही नाही. आलेले काही यात्रेकरूंना रात्री पायऱ्यांवर झोपावे लागते आणि याउलट येथे हॉटेल व लॉजेस ची संख्या मात्र दिडशेच्या घरात आहे. ही येथे एक मोठी शोकांतीकाच म्हणावे लागेल.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

इंडियन सायन्स काँग्रेस महिला सक्षमीकरणाची नांदी !

Tue Jan 3 , 2023
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात 108व्या इंडियन सायन्स काँग्रेसचे आयोजन करण्यात आले आहे. 1914 पासून आयोजित करण्यात येत असलेली ही परिषद यापूर्वी 1974 मध्ये नागपूर येथे घेण्यात आली. इंडियन सायन्स काँग्रेसची स्थापना 1914 मध्ये झाली असून, दरवर्षी जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात या परिषदेचे आयोजन करण्यात येते. सध्या तीस हजाराहून अधिक वैज्ञानिक या परिषदेचे सदस्य आहेत. देशातील वैज्ञानिकांनी संशोधनाला चालना द्यावी तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com