संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- आगामी 20 नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभेची निवडणूक यशस्वीरित्या शांततेत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने शहरातून विविध मार्गाने पैदल रूट मार्च करण्यात आला पैदल रूट मार्च प्रसंगी पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांनी ठिकठिकाणी नागरिकांची संवाद साधून आगामी विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता भयमुक्त वातावरणात मोठ्या प्रमाणात मतदान करून शहरात कायदा सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्याची करण्याचे आव्हान केले नवीन कामठी पोलीस ठाण्याच्या प्रगणातून पोलीस निकेतन कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत रूट मार्च सुरुवात करण्यात आली यावेळी सहाय्यक पोलीस उपायुक्त विशाल शिरसागर ,नवीन कामठीचे ठाणेदार प्रमोद पोरे ,जुनी कामठीचे ठाणेदार प्रशांत जुमडे, सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन यादव , मनीष हीवरकर, पोलीस उपनिरीक्षक निर्मला झाडे ,किशोर मोतीगे ,सह केंद्रीय राखीव पोलीस दल ,राज्य राखीव पोलीस दल ,पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस कर्मचारी ,होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते ,पैदल रूट मार्च इस्माईलपुरा, वारीस पुरा ,बूनकर कॉलनी ,पारसी पुरा ,जय भीम चौक, कामगारनगर, गावलीपुरा, जयस्तंभ चौक ,गोयल टॉकीज चौक, पोरवाल चौक ,शुक्रवारी बाजार ,फ़ेरुमाल चौक, रब्बानी चौक, कोळसा टाल ,भाजी मडी, कादर झेंडा ,खलासी लाईन ,राम मंदिर, मोदी पडावं, मेन रोड ,नेताजी चौक ,बोरकर चौक ,लाला ओली,सत्यनारायण चौक ,पोरवाल चौक ,भ्रमण करीत नवीन कामठी पोलीस ठाण्यात पैदल रूटमारचे समापन करण्यात आले.