नागपूर :- भारत सरकारने देशातील जुने कायदे बदलले आहे. त्यासोबत नवे कायदे संमत केले. १) भारतीय न्याय संहीता २०२३ २) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ३) भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ सदर कायदयाचे ०१ जुलै २०२४ रोजी अंमलबजावणी होणार असुन त्या अनुशंगाने नागपूर ग्रामीण पोलीस व महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिवर्सिटी नागपूर यांच्यामध्ये अधिकारी वर्गांना प्रशिक्षणाकरीता करार केला असुन दिनांक ३०/०३/२०२४ रोजी व ३१/०३/२०२४ रोजी नागपूर ग्रामीण पोलीस दलामधील सर्व वरीष्ठ अधिकारी, सर्व पोलीस उप अधिक्षक (Dysp) पोलीस अधिकारी, सर्व ठाणेदार व सर्व शाखा प्रमुख यांची ०२ दिवसीय सदर कायद्यातील सर्वसाधारण तरतुरीसंबंधाने कार्यशाळा ठेवली होती.
नविन कायदे १) भारतीय न्याय संहीता २०२३ २) भारतीय साक्ष अधिनियम २०२३ ३) भारतीय नागरीक सुरक्षा संहीता २०२३ सदर कायदयामधील नविन बदल झालेल्या कोर्ससाठी नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोहार व MNLU चे व्हाईस चान्सलर विजेंद्र कुमार यांच्या उपस्थितीमध्ये कार्यशाळेचे आयोजन केले होते. सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षक म्हणुन प्रा. डॉ. दिवीता पागे, प्रा. त्रिशा मित्तल, डॉ. आरती तायडे, डॉ. राहुल सांगगावकर यांनी नविन कायदयाचे सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच यापुढे देखील नागपूर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार करीता MNLU यांच्याकडुन या तिन्ही कायद्यातील विषेश तरतुदी संबंधी तसेच इतर स्पेशल कोर्स संबंधी कार्यशाळेचे चे आयोजन केले जाईल.