संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :-‘ सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय’हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर राहून कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राखण्याची मुख्य जबाबदारी ही पोलिसांची असते या कर्तव्यदक्ष भूमिकेतून स्थानिक नविन कामठी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी निर्गती पथक निर्माण करून मागील एक वर्षात प्रलंबित असलेले 84 पेक्षा वरील प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेत सर्व गुन्हे निर्गती करून घेत पोलिस निरीक्षक प्रमोद पोरे यांनी आपल्या कार्याप्रति असलेले उच्च समर्पण,वचनबद्धता सिद्ध केले.या उत्कृष्ट कामगिरी बद्दल डीसीपी निकेतन कदम यांनी पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे तसेच निर्गती पथक मधील सहकारी पोलीस उपनिरीक्षक कोडापे,श्याम गोरले,विशाल मेश्राम,रोशन कुळमेथे,मनोज गजभिये यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले.