नागपुर – अवैधरित्या दारू विकणारे व दारूची तस्करी करणारे पोलिसांच्या रडारावर असून अवैध दारू विकणाऱ्यांच्या व दारू तस्करी करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याचा पोलिसांनी सपाटा लावला आहे. अवैध दारू विकणाऱ्यांच्याही पोलिसांनी कुंडल्या तयार केल्या असून त्यांच्यावर पोलिस बारीक लक्ष ठेऊन आहेत. अवैध दारूची विक्री व तस्करी होत असल्याची माहिती कानावर पडताच चपळतापूर्वक सापळा रचून पोलिस त्यांना बेळ्या ठोकत आहेत.
गुन्हे शाखा युनिट क्र. 03 यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीती वरून पो.स्टे. गणेशपेठ हद्दीत शकुनबाई सनेश्रव हिचे घरी, गुजरवाडी रॉयल कॉम्पलेक्चे मागे रेड कारवाई केली असता यातील आरोपीचे ताब्यातुन एका प्लॉस्टीक पोत्यात 180 एम.एल. देशी दारू बॉटल एकुण 102 व 90 एम.एल. च्या 116 देशी दारू बॉटल असा एकुण 12,800/-रू. चा माल अवैधरित्या विक्री करण्याचे उद्देशाने मिळुन आल्याने जप्त करण्यात आला. आरोपी विरूध्द पो.स्टे. गणेशपेठ येथे कलम 65(ई) महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर कामगीरी अपर पोलीस आयुक्त गुन्हे रेड्डी, पोलीस उप-आयुक्त, (डिटेक्षन) चिन्मय पंडीत, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) रोशन पंडीत यांचे मार्गदर्शनाखाली पोनि विठ्ठलसिंग राजपुत सपोनि पवन मोरे, पो.हवा. दशरथ मिश्रा, श्याम अंगथुलेवार, रामचंद्र कारेमोरे, मिलींद चौधरी नापोशि समीश पांडे पो.अ./विषाल रोकडे, वर्शा हटवार यांनी केली आहे.