संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 14:- स्थानिक जुनी कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या आशा हॉस्पिटल समोरून अवैधरित्या ट्रक मध्ये गोमांस वाहतूक करणाऱ्या आरोपी ट्रकचालकावर कायदेशीर गुन्हा दाखल करून अटक करण्याची यशस्वी कार्यवाही आज सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान करण्यात आली असून अटक आरोपीचे नाव तसनीम अहमद फैय्याज अहमद वय 29 वर्षे रा बुनकर कॉलोनी कामठी असे आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गोमांस वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलिसांनी यशस्वीरीत्या सापळा रचून आज सकाळी साडे नऊ वाजेदरम्यान आशा हॉस्पिटल समोरून 12 टन गोमांस वाहतूक करोत असलेल्या ट्रक क्र एम एच 40 वाय 0696 वर धाड घालून आरोपी ट्रकचालकास ताब्यात घेऊन अटक करण्यात आले तर या कारवाहितुन जप्त ट्रक किमती 13 लक्ष रुपये व जप्त 12 टन गोमास किमती 18 लक्ष रुपये असा एकूण 31 लक्ष रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही यशस्वी कार्यवाही डीसीपी मनीष कलवानिया , एसीपी यांच्या मार्गदर्शनार्थ वरीष्ठ पोलीस निरीक्षक राहुल शिरे, पोलीस उपनिरिक्षक केरबा माकने,डी बी स्कॉड चे दिलीप ढगे, महेश कठाने,श्रीकांत भिष्णुरकर, अंकुश गजभिये,अरविंद आडे यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.