कन्हान :-यातील फिर्यादी दिनांक १३/०७/२०२४ रोजी पोस्टे कन्हान येथे हजर असतांना गुप्त बातमीदाराकडुन खात्रीशीर माहीती मिळाली कि, न्यु मार्केट कन्हान मच्छी मार्केट जवळ “रामु यादव हा आपले मालकीचे साई रेस्टॉरन्ट बिल्डींग मध्ये जुगाराचा गुत्ता चालवित असुन काही इसम जुगार खेळ खेळत आहे.” असे मिळालेल्या विश्वसनीय माहीती वरून पोलीस स्टॉफसह न्यु मच्छी मार्केट कन्हान येथे रेड केली असता एकुण १० इसम ५२ तास पत्यावर हारजीतचा जुगार खेळतांना मिळुन आले. १) विनोद रामभाऊ चांमट वय ३४ वर्ष रा. स्वामी विवेकानंदनगर कन्हान २) शांताराम सकींदर खडसे वय ५० वर्ष, रा. स्वामी विवेकानंदनगर कन्हान, ३) रामेश्वर मोरेश्वर खडसे वय ३४ वर्ष, रा. स्वामी विवेकानंद नगर कन्हान, ४) अश्विन रनवतसिंग खडसे वय २५ वर्ष सर्व रा. स्वामी विवेकानंद नगर कन्हान, ५) घनश्याम हरीगराडे वय ५५ वर्ष रा.शिवाजी नगर कन्हान, ६) मोहम्मद अली वल्द इसलाम अली वय ४५ वर्ष रा. खदान नं.०३ कन्हान, ७) विनोद गिरधर नान्ने वय २७ वर्ष, रा. न्यू मच्छी मार्केट कन्हान, ८) पवन मघय्या हातागडे वय ३० वर्ष रा. पटेलनगर कन्हान ९) हंसराज रामलाल नाडे वय ४२ वर्ष रा. विष्णुलक्ष्मी नगर कन्हान १०) आकाश गोपीचंद मेश्राम वय ४२ वर्ष रा. रेल्वे स्टेशन रोड कन्हान, यातील नमुद आरोपी यांची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे ताब्यातुन डावा वरून ५२ तासपत्ते कि. ४०- रू व नगदी १४००- रू मिळुन आले असा एकुण ३१८६०- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपीतांविरूध्द पोलीस ठाणे कन्हान येथे कलम ११२ भारतीय न्याय संहीता २०२३ सह कलम ४, ५ महाराष्ट्र जुगार अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि फुलझेले मो.क ९४०४१२३९५० पोलीस ठाणे कन्हान हे करीतआहे.
सदरची कार्यवाही ही हर्ष पोद्दार पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा.), रमेश धुमाळ अपर पोलीस अधिक्षक नागपुर (ग्रा) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश पाटील, सपोनि फुलझेले, पोलीस उपनिरीक्षक राठोड, पोलीस हवालदार सहारे, पोलीस नाईक आशिष कुंबरे, आतिष मानवटकर, पोलीस अंमलदार आकाश सिरसाट, कोमल खैरे, मपोहवा प्रतिभा मरसकोल्हे, नालंदा पाटील यांचे पथकाने पार पाडली.