– नागपुर ग्रामीण पोलीसांची कारवाई
सावनेर :-दिनांक २१/०४/२०२४ चे २०/४५ वा. ते २१/३० वा. दरम्यान पोलीस स्टेशन सावनेर येथील स्टाफ अवैध धंद्यावर रेड संबंधाने पेट्रोलिंग करीत असतांना पोलीस स्टेशन सावनेर हद्दीतील बाबासाहेव कापूस जीनिंग जवळ सावनेर परिसरात क्रिकेट मैच जुगारावर रेड केली असता यातील आरोपी नामे १) भूषण रामेश्वर घोळसे, वय २४ वर्ष रा. शेंदेकर ले आऊट वार्ड क्र. २ सावनेर २) साहिल मनोहरराव लांडगे वय २० वर्ष रा. बाजार चौक सावनेर यांनी सार्वजनिक ठिकाणी मोबाईल अॅप मध्ये टी ट्वेंटी आयपीएल क्रिकेट सामन्ऱ्यावर लोकांकडून मोबाईल फोनवरून बोलून पैशाचे बाजी लावून हारजीतिचा जुगार खेळताना मिळून आल्याने त्यांच्याकडून १) आय के कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमती ३००००/-रू. २) एक रीयलमी कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत अंदाजे २००००/- रुपये ३) एक पांढरा कागद क्रिकेट मॅच जुगाराची आकडे लिहिलेले कागद ४) निळा शाहीची बॉलपेन किंमत ३ रु, नगद २३००/- रू असा एकूण ५२३०३/- रुपयाचा मुद्देमाल जप्त करून आरोपीविरूद्ध कलम १२ (अ) महाराष्ट्र जुगार अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधिक्षक हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टे सावनेर येथील ठाणेदार रविंद्र मानकर यांचे नेतृत्वात त्यांचा स्टाफ यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.