संदीप कांबळे, कामठी
कामठी ता प्र 1:- आगामी बोर्ड आणि प्रवेश परीक्षांच्या पाश्वरभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 1 एप्रिल ला सकाळी 11 वाजता देशातील विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांशी संवाद साधला आणि परीक्षेच्या तणावावर मात कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले.
या पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यातील वरंभा, जाखेगाव, चिकना आदी शाळेतील विद्यार्थ्यांनी आज सकाळी 11 वाजता सज्ज राहून मोबाईल वा टीव्ही प्रोजेक्ट्रर च्या आधारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले ‘परीक्षा पे चर्चा 2022’ संवाद व मार्गदर्शन ऐकून घेतले.अधिक गुण मिळविण्याची स्पर्धा , कुटुंबातील सदस्यांची अपेक्षा, स्पर्धेचे वातावरण यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीती आणि तणाव निर्माण होतो . जसजशी परीक्षा जवळ येते तसतसा त्यांचा हा तणाव आणि भीती वाढत जाते.
तेव्हा अशा कठीण परिस्थितीत भीतीमुक्त , तणावमुक्त आणि मानसिकदृष्ट्या निरोगी बनविणे या मुख्य उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 एप्रिल ला तालकटोरा स्टेडियम न्यू दिल्ली येथून विद्यार्थी, शिक्षक, पालकवर्ग संवाद साधणार असल्याचे माहिती मिळताच कामठी तालुक्यातील संबंधित वेबसाईट वर शाळेकडून नोंदणी करण्यात आली होती त्यानुसार आज 1 एप्रिल ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा परीक्षा पे चर्चा या विषयावर संवाद ऐकून घेतला.