कामठी तालुक्यात बोगस एन ए च्या नावावर प्लॉट विक्री जोमात, प्रशासन कोमात…

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 04:- आयुष्यात प्रत्येकाला आपल्या निवाऱ्याची सोय करावी लागते याची सुरुवात एखादा प्लॉट वा घर घेतल्यापासून केली जाते.आपल्या आयुष्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान करून पै पै करीत गोळा केलेला पैसा हा प्लॉट खरेदीत केला जातो इतकेच नव्हे तर बँकेतुन कर्ज घ्यावे लागते मात्र येथील भूमाफिया बोगस एन ए च्या नावावर बोगस प्लॉट विक्री केल्याने कित्येकाचा विश्वासघात करून आर्थिक फसवणूक करीत आहेत. नागपूरला लागून हाकेच्या अंतरावर असलेल्या कामठी तालुक्यातील रणाळा, घोरपड, कोराडी, महादुला, बिडगाव ,खैरी,भिलगाव, म्हसाळा ,येरखेडा,, महालगाव, कापसी, वडोदा, तरोडी यासारख्या अनेक गावात अनधिकृत ले आउट धारकानो नियम धाब्यावर बसवून स्वतःच्या स्वार्थासाठी सुपीक जमिनींना अकृषक करण्यासाठी परवानगी काढण्याचा सपाटा सुरू केला आहे व एकीकडे अकृषक जमिनीचा परवाना मिळाला नसला तरी बोगस एन ए प्लॉट विक्री च्या नावावर बोगस प्लॉट विक्रो चा गोरखधंदा जोमात सुरू झाला असून एकच प्लॉट अनेकांना विकुन सर्वसाधारण प्लॉट धारकांची सर्रास फसवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. यामध्ये कामठी तालुक्यात बोगस प्लॉट विक्रो जोमात व महसूल प्रशासन कोमात असल्याचे दिसून येते.
वाढत्या नागरिकीरणाचा फायदा घेत शहरातील मोठ्या बिल्डरने नागपूर शहरालगतच्या बेसा, बेलतरोडी ,हुडकेश्वर ,नरसाळा, खरबी ,वाडी ,दवलामेटी, दाभक, कामठी ,हिंगणा, बुटीबोरी ,कळमेश्वर तसेच नागपूर –उमरेड मार्गावरील आणि नागपूर — भंडारा मार्गालगत च्या शेत जमिनी कमी किमतीत कशा खरेदी करता येईल या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत त्यासाठी बिल्डरने ग्रामीण भागात त्यांचे जाळे विणले आहेत आधीच आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांनी शेती करणे परवडण्याजोगी राहिले नसल्याने त्यांच्या फायदा बिल्डर्स मंडळींनी घ्यायला सुरुवात केली आहे.

ग्रामीण भागात शेत जमिनीला सोन्याचे भाव आले आहेत अनेक बिल्डर्स मालक ले आऊटला (एन ए) अकृषक न करता प्लॉटची विक्री करीत आहेत जमिनीला (एन ए) अकृषक करण्यासाठी तेरा विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अकृषक चे प्रमाणपत्र घ्यावे लागत असते त्याबाबत शासनाला लाखो रुपयांचा महसूल निधी प्राप्त होतो अकृषक जमिनीवर लेआऊट पाडताना संबंधित ग्रामपंचायत हद्दीतील सरपंच, सचिवाकडून लेआऊट मंजूर करून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागतो लेआउट ला मान्यता देण्यापूर्वी लेआउट मध्ये रोड ,रस्ते ,नाल्या ,पिण्याच्या पाण्याची सोय ,विजेचे खांब ह्या मूलभूत सोयी सुविधा, सोबतच सार्वजनिक उपयोगासाठी बाग-बगीचा व सार्वजनिक सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सभागृहाची जागा सोडली असेल तरच ग्रामपंचायत कडून मान्यता देण्यात येते परंतु अनेक ग्रामपंचायतचे सरपंच सचिव नियम धाब्यावर बसवून महसूल बुडवून लेआउटला मान्यता देत आहेत आजही कामठी तालुक्यात हजाराचे वर लेआऊटआहेत या लेआउट मध्ये रस्ते ,नाल्या, पानी, विजेची सोय नाहीत अनेक लेआउट मध्ये रस्ते ,नाल्या नसल्यामुळे सांडपाण्याची डबके साचले आहेत त्यामुळे त्या परिसरात डेंग्यू मलेरिया रोगाची न(साथ पसरत असते. आजही अनेक लेआऊट मध्ये पायी चालणे कठीण आहेत अनेक वाहनधारक अर्ध्या किलोमीटर अंतरावर गाड्या ठेवून रात्रीला अंधारात पायपीट करीत घरी जात आहेत अनेक लेआउट मध्ये बिल्डर्स ने लेआऊट मधील सार्वजनिक उपयोगाच्या बाग-बगीचा व संस्कृतीक सभागृहा करिता सोडलेली मोकळी जागा विकून हडप केले आहेत काही लेआउट मालकांनी बिल्डर्सनी एकाच प्लॉट दोन दोन व्यक्तीला विकण्यायाच्या घटना सुद्धा उजेडात आल्या आहेत अनेक तक्रारी पोलिस स्टेशनला पडल्या आहेत अनेक बिल्डर्स मालकाकडून जमिनीचा बयान पत्र करून टोकन देऊन लेआउट पाडून कागदपत्री दाखवून कमी भावात विकत असल्याचे दाखवून सामान्य नागरिकांची फसवणूक करीत आहेत तेव्हा कामठी तालुका महसूल प्रशासनाने यावर कंबर कसने तितकेच गरजेचे आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

कामठी तालुक्यातील बहुतांश तलाठी कार्यालये अजूनही भाड्याच्याच खोलीत 77 गावाचा कारभार सांभाळतात 24 तलाठी

Sat Jun 4 , 2022
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी कामठी ता प्र 4-शेतीसंबंधी महसुलाचे कामकाज योग्य प्रकारे चालावे यासाठी शासनाने तलाठी या प्रशासकोय कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून साझानुसार तलाठी कार्यालयाची निर्मिती केली आहे.तलाठी हा महसूल विभागाचा कणा असून कामठी तालुक्यातील चार महसूल मंडळातील 24 साझ्यात 24 तलाठ्या द्वारे 77 गावातील हजारो खातेदारांच्या जमिनींचे दस्तावेज आहेत .मात्र बरेच तलाठी कार्यालय हे भाड्याच्या खोलीत असून शासकीय दस्तावेज असुरक्षित […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com