– खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने तातडीने कारवाई ची मागणी !
नागपूर :-विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा आज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे तातडीने सुरू करण्यात यावीत अशी मागणी शेतकरी नेते आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) राष्ट्रीय प्रवक्ते किशोर तिवारी यांनी आज सरकार कडे केली आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री पियूष गोयल, राज्यमंत्री दर्शना जरदोष आणि वस्त्रोद्योग सचिव रचना शहा यांचेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविलेल्या ईमेल संदेशात तिवारी यांनी विदर्भ मराठवाड्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी मांडून गेल्या दीड महिन्यापासून लाखों क्विंटल कापूस खाजगी व्यापारी पडक्या भावात अक्षरशः लुटून नेत असून किमान आधारभूत किंमत सुद्धा दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत कमालीचे नैराश्य पसरले असून अनेक शेतकऱ्यांच्या दुर्दैवी आत्महत्या सातत्याने होत असून शेतकऱ्यांचे बेहाल थांबविण्यासाठी सी.सी.आय.ची कापूस खरेदी केंद्रे अद्यापही सुरू झालेली नाहीत या कडे लक्ष वेधले आहे.
कापूस खरेदी बाजारात किमान मूल्य आधारित खरेदी केंद्रे सुरू नसल्याने त्याचा नाहक फायदा खाजगी व्यापारी घेत असून आज विदर्भ मराठवाड्यात अनेक ठिकाणी उच्च प्रति चा कापूस सुद्धा ४०० ते ६०० रुपये कमी दरात विकण्याची पाळी शेतकऱ्यांवर आली आहे. कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा कापूस केंद्र सरकारने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीत खरेदी करणे नोडल एजन्सी कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असताना सुद्धा सी.सी.आय. खरेदी केंद्रे कधी सुरू होतील, याचा कांहीं थांगपत्ता नाही. जिथे केंद्रे सुरू केलीत तिथे सुद्धा खरेदी अजिबात नाही. कारण खाजगी व्यापारी आणि सी.सी.आय. चे अधिकारी यांचे लागेबांधे असल्याने कित्यके केंद्रावर सरसकट कापूस रिजेक्ट केला जात आहे तर दुसरी कडे खाजगी व्यापारी पडक्या किमतीत कापूस खरेदी करून शेतकऱ्यांची उघड लूट करीत आहेत. कोणताही पणन अधिकारी किंवा बाजार समिती शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात अपयशी ठरली असून अश्या विपरित परिस्थितीत केंद्र सरकारच्या नोडल एजन्सी असलेल्या कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया – सी.सी.आय. चे कायद्याने बंधनकारक असलेली खरेदी केंद्रे विदर्भ मराठवाड्यातील लाखों कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या भल्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याने सरकारने तातडीने आदेश द्यावेत , अशी मागणी किशोर तिवारी यांनी केली आहे.