खेलो इंडीया यूथ गेम्स 2021 नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन संपन्न

नागपूर  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय म.रा.पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युंवक सेवा, नागपूर विभाग नागपूर व जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर यांचे सयुक्त विद्यमाने खेलो इंडीया युथ गेम्स 2021 करीता नागपूर विभागीय कबड्डी स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन  दिनांक 04 डिसेंबर 2021  रोजी विभागीय क्रीडा संकुल, कोराडी रोड मानकापुर येथे करण्यात आले होते.या स्पर्धेत नागपूर विभागातून मुलांचे 6 संघ व मुलींचे  5 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेचा अंतिम निकाल खालील प्रमाणे आहे.

             18 वर्षा खालील मुले, विजयी- जिल्हा क्रीडा संकुल समिती, चंद्रपुर, उपविजयी महात्मा गांधी विद्यालय, आरमोरी, जिल्हा गडचिरोली (अंतिम सामन्याचे गुण 39-20 ), 18 वर्षा खालील मुली विजयी अशोक विद्यालय व कनि. महा.उमरेड,जि. नागपुर, उपविजयी जागृती क्रीडा मंडळ आर्वी, जि. वर्धा,( अंतिम सामन्याचे गुण 45-11)

            वरील सामन्यातील विजयी संघ दिनांक 15 ते 16 डिसेंबर 2021 या कालावधीत पुणे येथे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत नागपुर विभागाचे प्रतिनिधीत्व करतील. निवड समिती सदस्य म्हणुन  किशोर बोंडे व  विजय खोकले राज्य क्रीडा मागदर्शक तसेच श्रीमती पोर्णिमा उपरीकर यांनी काम पाहील. सदर स्पर्धेकरीता शेखर पाटील, उपसंचालक, क्री.यु.से.नागपूर विभाग श्री. अविनाश पुंड, जिल्हा क्रीडा अधिकारी, नागपूर यांचे मार्गदर्शनात व नागपूर जिल्हयातील शारीरिक शिक्षकांचे सहकार्याने सदर स्पर्धा यशस्वीरीत्या पार पाडल्या

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

News Today 24x7

Next Post

स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान केंद्र सज्ज

Mon Dec 6 , 2021
केंद्रावर 560 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आकड्यांमध्ये 1 हा पसंती क्रमांक लिहिणे अनिवार्य  नागपूर  :  नागपूर स्थानिक प्राधिकारी संघाची निवडणूक 10 डिसेंबर रोजी होत असून पंधरा मतदान केंद्रांवर 560 मतदार मतदान करणार आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्र सज्ज झाले असून निवडणूक निरीक्षकांनी या केंद्राची पाहणी सुरू केली आहे.             या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी विमला आर. आहेत तर निवडणूक निरिक्षक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com