चंद्रपूर :- जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे ५ जुन रोजी वृक्षारोपण करण्यात आले. सरकार नगर येथील मनपाच्या आदर्श उद्यान येथे महानगरपालिका उपायुक्त रवींद्र भेलावे व उपस्थीत नागरिकांच्या हस्ते विविध प्रजातींच्या रोपट्यांची लागवड करण्यात आली.
आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात उपअभियंता रवींद्र हजारे,कनिष्ठ अभियंता व उद्यान निरीक्षक चैतन्य चोरे, गितेश मुसनवार अक्षय वडपल्लीवार, संदीप रायपुरे, योगेश पेटले,तुषार हिवसकर यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा केला.
यावेळी परीसरातील रमेश पाटिल,फरहा कबीर शेख,रमेश विशवनाथ रामटेके,अशोक रामटेके, चंद्रसेन शाम कुवंर, सुनील मेश्राम, शाम गोड़े, केशव मेश्राम, वनश्री मेश्राम,आनंदी नामदेव सोमकुवर,सुनीता चांदेकर,सुरेश लुम्मे,हेमंत चिंचडकर,कल्पना जीवतोड़े,प्रमोद धुरड,अजय उत्तरवार,गुड्डू ठाकुर इत्यादी नागरीकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले. परीसरातील नागरीकांनी या रोपट्यांची लागवड करण्यास मदत तर केलीच शिवाय त्यांची निगा राखण्याची तयारीही दर्शविली.