यवतमाळ :- निवडणूक कालावधीत होर्डिंग, बॅनर, पोस्टर ठिकठिकाणी लावल्यामुळे शहराचे विद्रुपीकरण होते. त्यामुळे अशा बाबी परवानगी शिवाय लावण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. परवानगीने लावलेल्या या बाबी परवानगी संपल्यानंतर संबंधितांना काढणे बंधणकारक राहणार आहे.
मालमत्ता विद्रुपीकरण प्रतिबंध कायद्यान्वये जिल्हा दंडाधिकारी डॅा.पंकज आशिया यांनी याबाबत आदेश पारीत केले आहे. निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधित व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिंग, बॅनर्स, पोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर प्रतिबंध घालण्यात आले आहे.
या प्रतिबंध आदेशान्वये लोकसभा निवडणूकीच्या कालावधीमध्ये शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपता करण्यास निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध राहणार आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.