संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी तालुक्यांतर्गत येणाऱ्या नांदा पुनर्वसन गावात सामान्य फंडातून 40 लक्ष रुपये खर्च करून नाली बांधकाम करण्यात आले मात्र हे नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याने त्या नालीतून वाहणारे सांडपाणी पाझरून गावातील मनोज जामदार व नामदेव राऊत यांच्या विहिरीत पाझरल्यामुळे पाणी दूषित होऊन आरोग्यास हानिकारक ठरत आहे.
ही बाब पंचायत समिती सभापती दिशा चनकापूरे यांच्या निदर्शनास येताच आज दुपारी 2दरम्यान खुद्द सभापती दिशा चनकापुरे, बीडीओ प्रदीप गायगोले,विस्तार अधिकारी गावंडे आदींनी सदर नाली बांधकाम व विहिरींची पाहणी केली असता सदर नाली बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाले असूनही हे नाली बांधकाम न पाहताच बिल काढले की काय यावर साशंकता व्यक्त करीत निकृष्ट दर्जाच्या नाली बांधकामाचे बिल काढून भ्रष्टाचारास खतपाणी देणाऱ्या अभियंता बोरकर वर चौकशी करून कारवाही करण्यात यावी असे निर्देश सभापती दिशाताई चनकापुरे यांनी बीडीओ ला दिले.