संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कोणत्याही व्यवहारात खरेदी विक्रीचा करार असो किंवा शासकीय काम असो त्यासाठी शपथपत्र ,बॉण्ड हमीपत्र हे मुद्रांक पेपरवरच लिहून घ्यावे लागते. तर आता 1 एप्रिल पासून या मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष हजर राहणे बंधनकारक करण्यात आले आहे त्यामुळे तो व्हीआयपी असो किंवा अन्य कोणी एवढेच नव्हे तर महिला ,ज्येष्ठ व्यक्ती किंवा नागरिक यांनाही मुद्रांक कार्यलयात उपस्थित राहावे लागणार आहे. अशी माहिती मुद्रांक विक्रेता राजेश कांनफाडे यांनी दिली आहे.
ज्या व्यक्तीला मुद्रांक पेपर हवा असेल त्या व्यक्तीला स्वता मुद्रांक विक्रेत्याकडे जाऊन आधार कार्ड देऊन स्वाक्षरी करावी लागणार आहे .बँकेच्या कामकाजात तसेच इतर कोणत्याही व्यवहारात नेहमी मुद्रांक पेपरवर हमीपत्र,शपथपत्र द्यावेच लागते शिवाय मालमत्ता खरेदी असो विक्री असो यासाठी करार करण्यात येतो तेव्हा मुद्रांक खरेदीसाठी प्रत्यक्ष अनिवार्य आहे.
गैरप्रकार टाळण्यासाठी संबंधित विभागाने घेतलेला निर्णय हा स्तुत्य उपक्रम आहे त्यामुळे मुद्रांक पेपरचा दुरुपयोग होणार नाही .