मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम अंतर्गत लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी तिसरा टप्पा तिसरा टप्पा ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान

चंद्रपूर :- लसीकरणापासून वंचित राहिलेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० चा तिसरा टप्पा उद्या ९ ते १४ ऑक्टोबर दरम्यान राबविला जाणार असुन यात शून्य डोज घेतलेले, सुटलेले व वंचित लाभार्थी क्षेत्र, गोवरसाठी अतिजोखमीचा भाग, नवीन लसीअंतर्गत कमी काम झालेले क्षेत्र, नियमित लसीकरण सत्र न झालेले क्षेत्र, स्थलांतरित भागातील लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात येणार आहे.

बालकांमधील मृत्यू व आजारपणाचे प्रमाण कमी करण्यासाठी लसीकरण हे एक प्रभावी साधन असून, अर्धवट लसीकरण झालेले, तसेच लसीकरण न झालेली बालके ही पूर्ण लसीकरण झालेल्या बालकांपेक्षा लवकर आजारी पडतात किंवा मृत्यू पावतात त्यामुळे केंद्र शासनाने डिसेंबर २०२३ पर्यंत गोवर रूबेला आजाराचे दुरीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले असून, यासाठी चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात ऑगस्ट महिन्यापासून विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० चंद्रपूर मनपातर्फे राबविण्यात येत आहे.

यासंदर्भात सिटी टास्क फोर्स समितीची आढावा बैठक ५ ऑक्टोबर रोजी अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मनपा सभागृहात घेण्यात आली.याप्रसंगी डॉ. वनिता गर्गेलवार,डॉ. साजिद, आयएमए व आयएपीचे प्रतिनिधी उपस्थीत होते. विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० या मोहिमेंतर्गत झीरो ते दोन वर्ष वयोगटांतील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेल्या लाभार्थ्यांचे सर्व लसींद्वारे लसीकरण करण्यात येणार आहे. दोन ते पाच वयोगटांतील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल, तसेच डीपीटी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचेही लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर गर्भवती महिला यांचे लसीकरण कार्यक्रमांतर्गत करण्यात येत असुन ६ ऑगस्ट २०१८ किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालकांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

मिशन इंद्रधनुष्यकरिता मनपा आरोग्य विभागामार्फत ७० लसीकरण केंद्रे व ६ मोबाईल टीम तयार करण्यात आल्या असून आपली बालके निरोगी व सुदृढ राहण्यासाठी नियमित लसीकरण करणे गरजेचे असल्याने कोणतेही बालक लसीकरणापासून वंचित राहू न देण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध प्रतिकृतीच्या अवहेलनाला कोण जवाबदार ?

Sun Oct 8 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  -जयस्तंभ चौकातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराची दुरावस्था कामठी :- दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्ध धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त हजारोच्या संख्येतील आंबेडकरी अनुयायांनी जयस्तंभ चौक स्थित परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहायला येणार असून या पुतळा परिसरात असलेली दुरावस्था तसेच या परिसरात स्थापित असलेल्या महाकारूनिक तथागत गौतम बुद्ध यांच्या प्रतिकृतीलगत नळाचे वाहते पाणी जमा होत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com