पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सोहेल खान यांची नियुक्ती

नागपूर – पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नागपूर शहर युवक आघाडीच्या अध्यक्षपदी सोहेल खान यांची नियुक्ती लाॅंग मार्च प्रणेते तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे  व पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आली. सीताबर्डी, आंनदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात नवनियुक्त शहर अध्यक्ष सोहेल खान यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी बोलतांना प्रा. जोगेंद्र कवाडे म्हणाले की, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे कार्य जनमानसात पोहचविण्याकरिता युवकांनी समोर आले पाहीजे. युवा नेतृत्वाने पक्ष मजबूत होणार असेही ते म्हणाले. तत्पूर्वी जिजाऊ माॅंसाहेब, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहिर अण्णा भाऊ साठे, अशपाख उल्लाह खान या सर्व महापुरुषांच्या प्रतिमेला प्रा. जोगेंद्र कवाडे  व पीरिपाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप जोगेंद्र कवाडे यांच्या हस्ते माल्यापर्ण करून अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाराष्ट्र प्रदेश संघटक कपिल लिंगायत, रमाई ब्रिगेडच्या नेत्या सौ. प्रतिमाताई जयदीप कवाडे, पीआरपी नागपूर शहर अध्यक्ष कैलास बोंबले, जेष्ठ नेते (कामगार नेते) बाळूमामा कोसमकर, शहर सचिव अजय चव्हाण, उपाध्यक्ष प्रकाश मेश्राम, रोशन तेलरांध्ये, विपीन गडगीलवार यांची उपस्थिती होती. यावेळी जयदीप कवाडे यांनी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, नवनियुक्त सोहेल खान यांनी पक्ष वाढीसाठी जोमाने काम करावे. नवीन सदस्यांना जोडण्याकरिता अभियान राबविण्यात यावे असेही जयदीप कवाडे म्हणाले. या कार्यक्रमाला स्वप्नील महल्ले, बापूभाऊ भोंगडे, पियुष हलमारे, पूर्व नागपूर युवक अध्यक्ष कुशीनारा सोमकुवर, प्रकाश मेश्राम, भीमराव कळमकर, विक्की बनकर, नाजीम खान, जिनीत भीमटे, अमित यादव, कुणाल उईके, पारस गोंडाने, संदेश भांडारे, सुनील मेश्राम, साहिल पठाण, शान भाई, सिराज शेख, सिजन खान, सना खान, अलि खान, अमेय पराते, राजेश खन्ना, अली भाई, मुकेश खन्ना, हाफिज भाई, आकाश पाटील, शाहबाज भाई, बसिम भाई, उत्तम हुमणे, अक्षय नानवटकर, फिरोज इंदूरकर,रमेश गेडाम, मोरेश्वर दुपारे, अजय वासनिक, प्रमोद लोखंडे, योगेश चव्हाण, प्रभाकर बागडे, प्रदीप बाबरीया, कुंदन उके, प्रमोद भोगचंदानी सह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

ब्रह्मकुमारीच्या राज्यातील 'स्वर्णिम भारत' अभियानाला राज्यपालांच्या उपस्थितीत आरंभ

Tue Mar 1 , 2022
मुंबई –  ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयतर्फे आयोजित ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाकडून स्वर्णिम भारताकडे’ या अभियाना अंतर्गत राज्यात आयोजित विविध कार्यक्रमांचा शुभारंभ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १) राजभवन येथे झाला. ब्रह्माकुमारी या संस्थेने सुरुवातीपासून महिलांकडे नेतृत्व दिल्याबद्दल राज्यपालांनी संस्थापकांच्या दूरदृष्टीला वंदन केले. यावेळी राजयोग ध्यान घेण्यात आले. राज्यपालांनी यावेळी मोटर बाईक रॅलीला झेंडी दाखवून रवाना केले. कार्यक्रमाला ब्रह्माकुमारीच्या महाराष्ट्र झोनच्या […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com