मुंबई :- लोकनेते व माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांना 10 व्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयात सोमवारी आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी प्रदेश सचिव नवनाथ पडळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश मुख्यालय प्रभारी रवी अनासपुरे, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आदी उपस्थित होते.