पेंच व बोर व्याघ्र प्रकल्प आणि उमरेड कऱ्हांडला अभयारण्य पर्यटकांसाठी सुरु

नागपूर –  पेंच, बोर व्याघ्र प्रकल्प व उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील पर्यटन गेटवरुन 1 ऑक्टोबर पासून पर्यटन सुरु करण्यात आले आहे. सफारीकरिता अनुकूल असलेले पर्यटन रस्ते व पावसाची स्थानिक परिस्थिती लक्षात घेता पेंच व्याघ्र प्रकल्पातील सिल्लारी गेट, देवलापार गेट, चोरवाहुली गेट तसेच बोर व्याघ्र प्रकल्पातील बोरधरण पर्यटन गेट आणि उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील कऱ्हांडला व पवनी गेट 15 ऑक्टोबर पर्यंत पर्यटकांकरिता ऑफलाईन पध्दतीने गेटवरील वाहन क्षमतेच्या मर्यादेत सफारी सुविधा उपलब्ध राहणार आहे.

या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे, सफारीकरिता पेंच व्याघ्र प्रकल्पात रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन सद्यस्थितीत पर्यटन झोन सफारी करिता उपलब्ध राहणार आहे.

बोर व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात बोरधरण पर्यटन गेट येथे बोर जलाशयातील पाणी पर्यटन रस्त्यावर आले असल्याने पाण्याची पातळी कमी होईपर्यंत अडेगाव गेट सुरु राहणार नाही. उमरेड-पवनी-कऱ्हांडला अभयारण्यातील गोठणगाव पर्यटन झोन रस्ता सफारीकरिता अनुकूल नसल्यामुळे सद्यस्थितीत बंद राहील.

पर्यटकांना ऑनलाईन सफारी बुकींगची सुविधा 16 ऑक्टोबर पासून www.mahaecotourism.gov.in या संकेतस्थळावरुन उपलब्ध राहील. अधिक माहितीसाठी क्षेत्र संचालक पेंच व्याघ्र प्रकल्प तसेच विभागीय वन अधिकारी (वन्यजीव) बोर अभयारण्य कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0712-2560727/2560748, उपसंचालक, पेंच व्याघ्र प्रकल्प, नागपूर यांचे कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 0712-2811921 यावर संपर्क साधावा.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

५६५ दुर्गा मूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन

Sat Oct 8 , 2022
कोराडीमध्ये ३९५ मूर्ती विसर्जित नागपूर :- शहरातील दुर्गा उत्सव मंडळांच्या मूर्ती विसर्जनासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली होती. मनपाद्वारे लक्ष्मीनगर, धरमपेठ आणि हनुमान नगर झोनसह कोराडी तलाव परिसरात मूर्ती विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व ठिकाणी एकूण ५६५ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोराडी तलाव परिसरातील विशाल कृत्रिम विसर्जन तलावात ३९५ मूर्ती विसर्जित झाल्या. मनपा आयुक्त तथा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com