काटोल :-दि. ११/०७/२०२४ रोजी पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामिण हर्ष पोद्दार, यांच्या अध्यक्षतेखाली आगामी येणाऱ्या मोहरम व आषाढी एकादशी निमित्याने पोलीस ठाणे काटोल हद्दीतील सर्व धर्मीय लोक, पोलीस पाटील व पत्रकार यांची एकत्रितरित्या सन उत्सव दरम्यान शांतता राखण्याबाबत पोलीस ठाणे काटोल च्या सभागृहामध्ये बैठक घेण्यात आली. बैठकीमध्ये पोलीस अधिक्षक यांनी लोकांच्या अडीअडचणी जाणुन घेवून सन उत्सवादरम्यान शांतता राखण्याबाबत समज दिली.तसेच काटोल शहराचा इतिहास पाहता आजपावेतो येथे धार्मिक तणाव निर्माण झालेले नाही.
कोणीही धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणार नाही अशी समज दिली तसेच गुन्हेगार हे एकाच समाजाचे नसतात ते कोणत्याही समाजाचे असु शकतात. त्यामूळे कोणत्याही समाजाला टार्गेट करणे चुकीचे आहे. काटोल शहरामध्ये अवैध धंदे कोणीही करणार नाही असे सांगितले, सदर बैठकी करीता मा. उपविभागीय अधिकारी काटोल पडोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी काटोल विभाग काटोल बापू रोहोम, पोलीस निरीक्षक काटोल मेश्राम व ८० ते ९० लोकं उपस्थितीत होते.