अरोली :- तारसा – निमखेडा जिल्हा परिषद क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येसंबा येथे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या फोटोला पूजा अर्चना, माल्य अर्पण व त्यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकून त्यांना नमन करण्यात आले.
याप्रसंगी पोलीस पाटील नरेंद्र राऊत, उपसरपंच धनराज हारोडे, ग्रामपंचायत सदस्या करिश्मा पानतावणे,हिरा चकोले, मिनाक्षी कारोंडे,आशा वर्कर सुषमा गजभिये,कांता गजभिये,सोहन हारोडे, प्रेषित चकोले,बादल भिवगडे, पंकज चकोले, हर्षद हारोडे,निधी मेश्राम,गिता गजभिये, हर्षा मेश्राम, संजय गजभिये प्रामुख्याने उपस्थितीत होते.