शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना थकीत हप्‍ते द्या- आमदार सुधाकर अडबाले यांची मागणी

नागपूर :- सातव्‍या वेतन आयोगाच्या थकबाकीचा चौथा हप्‍ता अदा करण्याबाबत वित्त विभागाचा शासन निर्णय जाहिर झाला आहे. मात्र, शिक्षकांना अद्यापही दुसरा, तिसरा हप्‍ताच मिळाला नसल्‍याने शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांत तीव्र असंतोष पसरला आहे. त्‍यामुळे शासनाने सातव्‍या वेतन आयोगाचे सर्व थकीत हप्‍ते अदा करावे, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे.

स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्‍च माध्यमिक व आश्रम शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्‍या वेतन आयोगाचा दुसरा व तिसरा हप्‍ताच मिळाला नाही. काहींना तर पहिला हप्‍ता सुद्धा मिळाला नाही. त्‍यातच २४ मे २०२३ रोजी वित्त विभागाचा चौथा हप्‍ता अदा करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानुसार राज्यातील कर्मचाऱ्यांना जून महिन्यात वेतनासोबत सातव्या वेतन आयोगाच्या चौथा हप्ताची रक्‍कम मिळेल. मात्र, राज्यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी अनुदानित प्राथमिक, माध्यमिक, उच्‍च माध्यमिक व आश्रम शाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अद्याप दुसरा व तिसरा हप्ता मिळालेला नाही. ही बाब शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारी असल्‍याने शिक्षकांमध्ये तीव्र असंतोषाची भावना निर्माण झाली आहे.

इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे शिक्षकांना सातव्‍या वेतन आयोगाचे थकीत असलेले सर्व हप्‍ते तात्‍काळ देण्यात यावे, अशी मागणी नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केली आहे. यासंदर्भात शासनस्‍तरावर पत्रव्‍यवहार केला असून ही मागणी रेटून धरणार असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले. जून महिन्‍यात थकीत हप्‍ते न मिळाल्‍यास जुलै महिन्‍यात काही शिक्षक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

एसटी कर्मचाऱ्यांना गोड बातमी मिळणार, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत काय ठरले?

Sat Jun 3 , 2023
मुंबई : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आमदार पडळकर यांनी एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अन् प्रलंबित मागण्यांवर चर्चा केली. तसेच राजकीय प्रश्नावर चर्चा केली. या बैठकीनंतर एसटी कर्मचाऱ्यांना लवकरच सकारात्मक बातमी मिळणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांकडून मिळाले आहे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!