भगवान गौतम बुध्दांच्या धम्मातून जगाच्या कल्याणाचा मार्ग   – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर :- भगवान गौतम बुध्दांनी जो आपल्याला धम्म दिला त्या धम्माच्या मार्गावर चालण्यातच जगाच्या कल्याणाचा मार्ग दडला आहे. आजचा दिवस हा संकल्प घेण्याचा दिवस आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

ड्रॅगन पॅलेस येथे अंतरराष्ट्रीय पर्यटक अतिथी गृहाच्या भूमिपूजन समारंभा निमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री ॲड. सुलेखा कुंभारे, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार टेकचंद सावरकर व मान्यवर उपस्थित होते.

दीक्षाभूमी नंतर नागपुरला जागतिक लौकिकात आणल्याचे काम सुलेखाताईंनी ड्रॅगन पॅलेसच्या माध्यमातून केले आहे. संपूर्ण जीवन त्यांनी धम्म प्रचारासाठी समर्पित केले आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो भाविक नागपुरला भेट देतात. या भेटीत ते आर्वजून ड्रॅगन पॅलेसलाही भेट देतात. येथील स्वच्छता व निगा उत्तम असल्याने स्वाभाविकच याला एक विशेष महत्त्व आहे. आज योगायोगाने सुलेखाताईंचा जन्म दिवस असून ताईंच्या सर्व उपक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छा दिल्या.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

नागपूर ॲक्वा फेस्ट’चे आमदार परिणय फुके यांच्या हस्ते उद्घाटन

Sun Oct 13 , 2024
– आजपासून तीन दिवस घेता येणार जल पर्यटनाची पर्वणी नागपूर :- महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) मार्फत आयोजित नागपूर जल पर्यटन महोत्सव अर्थात नागपूर अॅक्वा फेस्ट २०२४ उद्घाटन आमदार परिणय फुके यांच्या हस्ते झाले. फुटाळा तलाव येथे आयोजित या विशेष कार्यक्रमास पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनोजकुमार सुर्यवंशी, एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक दिनेश कांबळे उपस्थित होते. चे दि. १२ ते […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com