नागपुर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर विद्यार्थी विकास विभाग अंतर्गत आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक स्पर्धा निवड चाचणी 2024 दिनांक 19 ते 21 सप्टेंबर 2024 मध्ये छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था द्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मधील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग नोंदविला, सर्व स्पर्धक संगीत विभाग प्रमुख सचिन देशमुख यांच्या मार्गदर्शनात सहभागी झाले, गृह अर्थशास्त्र विषयाचे विद्यार्थ्यांनी रांगोळी, स्पॉट पेंटिंग कोलेज पेंटिंग मध्ये सहभाग घेतला, BBA आणि BCCA विषयाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक रित्या वादविवाद ,प्रश्नमंजुषा ,शास्त्रीय नृत्य व मेहंदी स्पर्धेत सहभाग घेतला, प्राध्यापक सचिन देशमुख व प्राध्यापक हर्षल रोठे यांनी संगीत विषयाच्या विद्यार्थ्यांसह शास्त्रीय संगीत व सुगम संगीत स्पर्धेत सहभाग घेतला.
या स्पर्धेसाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव डॉ. मारुती वाघ, संस्थेच्या संचालिका डॉ. लता वाघ ,प्राचार्य डॉ. वानखडे यांचे विद्यार्थ्यांना शुभाशीर्वाद आणि मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच संस्थेतील सर्व विभाग प्रमुख आणि प्राध्यापक वृदांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी प्रोत्साहन आणि शुभेच्छा दिल्या.