नागपूर :-जागतिक शौचालय दिन 2023 चे औचित्य साधून केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाने (mohua) येत्या 25 डिसेंबर पर्यंत देशव्यापी “स्वच्छ शौचालय मोहीम” राबविण्याचे ठरविले असून, नागपूर महानगरपालिकेने मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदविण्याचे ठरविले आहे.
नागपूर महानगरपालिका आयुक्त तसा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल यांच्या नेतृत्वात हे मोहीम यशस्वीरित्या राबविण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी देखील स्वच्छ सुंदर स्वच्छ नागपूर साकारण्यास पुढाकार घेत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपा द्वारे करण्यात आले आहे.
सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांचे परिचालन प्रभावी करण्यासाठी आणि त्याच्या शाश्वत भविष्यासाठी, सर्व सार्वजनिक आणि वस्ती पातळीवरील शौचालयांची स्वच्छता आणि देखभाल करण्यासाठी हा 5 आठवड्यांचा उपक्रम राबवला जात आहे. स्वच्छता, सहज उपलब्धता, अभिनव संरचना, तसेच कार्यक्षमतेचे उदाहरण ठरतील, अशी मॉडेल सार्वजनिक शौचालये ओळखण्याच्या उद्देशाने, स्वच्छ शौचालये चॅलेंज (आव्हान) सुरू करण्यात आले आहे. या अभियानात मनपा सहभागी झाले असून, नागपूर शहरातील सार्वजनिक प्रसाधनगृहांच्या स्वच्छ्ता वर भर दिला जाणार आहे.
2014 मध्ये सुरू झाल्यापासून, स्वच्छ भारत मिशनने जागतिक स्तरावर स्वच्छता पद्धतींमध्ये क्रांती घडवून आणली आहे. टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये स्वच्छता, यांत्रिक मैला व्यवस्थापन आणि युडब्ल्यूएम ला चालना देण्यावर लक्ष केंद्रीत करून, स्वच्छ भारत मिशन- शहरी 2.0 ने प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करण्यासाठी नवोन्मेष, प्रशासन, तसेच लहान शहरांनी संरचना आणि अंमलबजावणीमध्ये चक्राकार अर्थव्यवस्थेचा दृष्टीकोन स्वीकारण्याची गरज अधोरेखित केली आहे. नागरिकांनी देखील स्वच्छ सुंदर स्वच्छ नागपूर साकारण्यास पुढाकार घेत मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन मनपा द्वारे करण्यात आले आहे.