लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा – आर.आर. पाटील

– 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन

गडचिरोली :- महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे निर्देशान्वये तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश विकास एस.कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीच्यावतीने दिनांक 27 जुलै 2024 रोजी शनिवारला राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, गडचिरोली/अहेरी तसेच तालुका न्यायालय, अहेरी, आरमोरी, चामोर्शी, देसाईगंज, धानोरा, कुरखेडा, सिरोंचा येथे आयोजित राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये न्यायालयातील तडजोडीस पात्र फौजदारी प्रकरणे, दिवाणी दावे असे प्रलंबित वाद तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणे दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने आपसी तडजोडीने निकाली काढण्यात येणार आहेत. यासाठी पक्षकार, अधिवक्ता तसेच नागरिकांनी राष्ट्रीय लोक अदालतमध्ये मोठया प्रमाणात आपसी तडजोडीने प्रकरणे निकाली काढावीत, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोलीचे अध्यक्ष, सचिव व सर्व सदस्य यांनी केले आहे.

राष्ट्रीय लोक अदालतमध्ये न्यायालयातील प्रलंबित तडजोडीस पात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे, 138 एन.आय.अॅक्ट प्रकरणे, भु-संपादन प्रकरणे, कौटुंबिक प्रकरणे, मोटार वाहन अपघात दावा प्रकरणे, दरखास्त प्रकरणे, बँकेशी संबंधीत प्रकरणे तसेच वाद दाखलपुर्व प्रकरणांमध्ये टेलीफोन, मोबाईल कंपनी संबंधीत वाद, महाराष्ट्र राज्य वीज वितरण प्रकरणे, पंतसंस्थेशी संबंधीत प्रकरणे, नगर परिषद व ग्रामपंचायत अंतर्गत कर आकारणीचे प्रकरणे तसेच जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच येथील प्रकरणे इत्यादी प्रकरणांचा समावेश असणार आहे. लोकन्यायालयात पारीत झालेल्या अवॉर्डची न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे अंमलबजावणी करता येते. लोकन्यायालयात तडजोड केल्याने लोकांचा वेळ, श्रम व पैसा यांची बचत होते. दोन्ही पक्षकारांमध्ये असलेले वैर संपुन गोडवा, चांगले संबंध निर्माण होतात.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत संपुर्ण राज्यात 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे नियोजन केले आहे. तरी सर्वांनी दिनांक 27 जुलै 2024 रोजी होणा-या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन सचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गडचिरोली, आर.आर. पाटील यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा पथ विक्रेता समिती सदस्य पदाची निवडणूक अविरोध

Sat Jun 29 , 2024
चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे घेण्यात आलेल्या पथविक्रेता समिती सदस्य पदाच्या निवडणुकीत सर्वच सदस्य अविरोध निवडुन आले असुन निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपायुक्त मंगेश खवले यांच्या हस्ते नवनिर्वाचित सदस्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या निवडणुक प्रक्रियेमध्ये विजयी उमेदवार सर्वसाधारण खुला गटातुन अजाबराव शामराव डंभारे,अब्दुल जावेद छोटे मिया शेख,पल्लवी राजेश वानखेडे,अनुसुचित जाती गटातुन वसंता गोमाजी वानखेडे,अनुसुचित जमाती गटातुन लक्ष्मण चंपत […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com