नागपूर :- नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील श्री सिद्धिविनायक मंदिरात सुखकर्ता दु:खहर्ता विनायकाकडून मांगल्याची प्रेरणा घेउन स्थापन झालेल्या श्री सिद्धिविनायक सेवा फाऊंडेशनद्वारे मागील साडेपाच वर्षांपासून सुरु असलेल्या दीनदयाल थाळी उपक्रमाचा कृतज्ञता सोहळा मंगळवारी २५ एप्रिल रोजी आयोजित करण्यात आला आहे.
मंगळवारी सायंकाळी ६.३० वाजता मेडिकल कॉलेज परिसरात असलेल्या दीनदयाल थाळी येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सायंकालीन भरड अन्न थाळीचे लोकार्पण होणार आहे.
या सोहळ्यात उपस्थित होणाऱ्या सर्वांच्या वाहन पार्कींगची व्यवस्था राजाबक्षा हनुमान मंदिर प्रांगणात करण्यात आली आहे. सोहळ्यात उपस्थित होणाऱ्या सर्वांनी आपले दुचाकी व चारचाकी वाहन मंदिर प्रांगणातच पार्क करून सोहळ्यात सहभागी व्हावे व आयोजनास सहकार्य करावे, असे आवाहन श्री सिध्दीविनायक सेवा फाऊंडेशन नागपूर व दीनदयाळ थाळी संचालन समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले आहे.