भंडारा :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिनांक 24 जून 2024 रोजी भंडारा जिल्ह्यातील जलपर्यटन प्रकल्पाच्या पहील्या टप्पयाचे भुमिपूजन व भंडारा विधानसभा क्षेत्रातील 547 कोटींच्या विकास कामांच्या भुमिपूजन सोहळाकरीता जिल्हयात येत आहे. मुख्यमंत्री यांच्या दौरा संबंधाने जिल्ह्यात येणाऱ्या वाहनांकरीता खालील ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
तुमसर व मोहाडी मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता दसरा मैदान, जिला माता शाळा सहकार नगर व जकातदर कन्या शाळा येथे वाहन पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. पवनी, अड्याळ व साकोली मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता तुरस्कर मैदान व गांधी उच्च प्राथमिक शाळा मुस्लीम लायब्ररी चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. जवाहरनगर व फुलमोगरा मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता गणेश स्कुल राजीव गांधी चौक येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. सातोना, खोकरला व मोहदुरा मार्गे येणाऱ्या वाहनांकरीता म्हाडा कॉलनी मैदान खात रोड येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिकारी व व्ही.आय.पी. वाहनांकरीता नुतन महाराष्ट्र विद्यालय येथे पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे तर सेंट पॉल स्कुल येथील जागा राखीव ठेवण्यात आली आहे.