नागपूर – पारकर हनीफान इंडिया प्रा.लि. बाजारगांव येथे ५१ वा राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह समारोह साजरा करण्यात आला. दिनांक ०४ ते १० मार्च पर्यंत चालणाऱ्या या सप्ताहात कारखान्यात कामगारांच्या एकूण सुरक्षे विषयी प्रशिक्षण देण्यात आले. त्यात प्राथमिक उपचार फायर मॉक ड्रिल, कामगारांचे आरोग्य तपासणी व सुरक्षा संबंधित सुलोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, निबंध स्पर्धा असे अनेक प्रकारचे कार्यक्रम राबविण्यात आले. यावेळी कामगारांनी व त्यांच्या कौटुंबिक सदस्यांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद दिला. सुरक्षा सप्ताहाचा समारोप दि. १० मार्च रोजी, कारखाना परिसरात करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विजयकुमार मगर (IPS ) सुप्रिंटेंडन्ट ऑफ पोलीस नागपूर ग्रामीण यांची उपस्थिती होती.
विजयकुमार मगर यांनी व्यवस्थापनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाचे स्वागत करीत सुरक्षिततेचे पालन केवळ कारखान्यातच नव्हे, तर समाजात वावरताना देखील करावे, असा सल्ला सर्व उपस्थित कामगारांना दिला. या कार्यक्रमात कामगारांच्या पाल्यांची घेतलेल्या सहभागाचे कौतुक केले व नमूद केले कि, अशा प्रकारे व्यवस्थापन येणाऱ्या पिढीला देखील सुरक्षे विषयी मार्गदर्शन करीत आहे. व्यवस्थापनाद्वारा घेतलेल्या स्पर्धांमधील विजेत्यांचे अभिनंदन करीत त्यांनी विजेत्यांना बक्षीस प्रदान केले व अशा उपक्रमाला भविष्यात आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.