विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी पालकांनी सहकार्य करावे

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– धर्मराज शाळेत पालकसभेत मुख्याध्यापक बढिये यांचे भावनिक आवाहन

कन्हान :- गुणवत्तापुर्ण शिक्षण व शिस्त हा धर्मराज प्राथमिक शाळेचा मजबुत पाया आहे. बालवयातच विद्यार्थ्यांच्या सर्वागीण विकासासाठी शिक्षकांच्या प्रयत्ना सोबतच पालकांनी सुध्दा दररोज एक तास देऊन सहकार्य करावे, असे भावनिक आवाहन मुख्याध्यापक खिमेश बढिये यांनी केले.

धर्मराज प्राथमिक शाळेत शनिवार (दि.१०) पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष विधिलाल डहारे तर प्रमुख पाहुणे म्हणुन मुख्याध्यापक खिमेश बढिये, ज्येष्ठ शिक्षिका चित्रलेखा धानफोले, Olympiyad स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शक आशिष मोहुर्ले, पालक प्रतिनिधी व पत्रकार रविंद्र दुपारे, धर्मराज विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश डुकरे उपस्थित होते.

यावेळी मार्ग दर्शन करताना मुख्याध्यापक बढिये यांनी विविध शिष्यवृत्ती संदर्भातील माहिती दिली व पात्र पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रस्ताव १५ सप्टेंबर २०२४ पर्यंत वर्ग शिक्षकांकडे जमा करण्याचे आवाहन केले. आय कार्ड संदर्भातील धोरण जाहीर करुन १५ सप्टेंबर पर्यंत सर्वांना आय कार्ड उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे सांगितले. शाळेत मूल शिकत असताना त्याचा अभ्यासक्रम, स्वाध्याय या बाबींकडे पालकांनी लक्ष केंद्रित करावे व अडचण असल्यास लागलीच शिक्षकांशी संपर्क साधुन अडचणीचे निराकरण करावे. विद्यार्थ्यांच्या सर्वागीण शैक्षणिक विकासासाठी एक सजग पहरी म्हणुन पालकांनी भूमिका अदा करावी, असे आवाहन मुख्याध्यापक बढिये यांनी केले.

यावेळी पालकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करुन समाधान करण्याचा प्रयत्न केला. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विधिलाल डहारे यांची निवड करण्यात आली. तर पालक सदस्य म्हणुन इयत्ता पहिली तुन शरद वाटकर, मनिषा कारस्कर, विलास सरोदे, इयत्ता दुसरीतुन रोशन भोयर,  करुणा पाटील, कैलास उईके, इयत्ता तिसरीतुन विधिलाल डहारे, वैशाली कोहळे, लक्ष्मीनारायण बल्लारे, इयत्ता चौथीतुन राजकुमार महल्ले, किरण चकोले व अमृता बिस्ट यांची निवड करण्यात आली.

याप्रसंगी Olympiyad परिक्षे संदर्भात आशिष मोहुर्ले यांनी मार्गदर्शन करित इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन केले. या स्पर्धेसाठी ३०० रुपये परीक्षा फी असुन यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असल्याची माहिती दिली. सातत्याने शहरी भागात होणारी ही स्पर्धा ग्रामीण भागात आयोजित केली असुन या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन शिक्षक प्रतिनिधी भिमराव शिंदेमेश्राम यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार अमीत मेंघरे यांनी मानले. पालक सभेच्या आयोज नासाठी भिमराव शिंदेमेश्राम, अमीत मेंघरे, गणेश खोब्रागडे, किशोर जिभकाटे, चित्रलेखा धानफोले, शारदा समरीत, हर्षकला चौधरी, अर्पणा बावनकुळे, प्रिती सुरजबंसी, पूजा धांडे, वैशाली कोहळे, महादेव मुंजेवार, सुलोचना झाडे, नंदा मुद्देवार, परी अनकर, उषा नाटकर, दिपाली हिवरकर यांनी सहकार्य केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बिअर बार मध्ये वाद,तरुणाच्या मानेवर काचाचा ग्लास मारून केला जीवे मारण्याचा प्रयत्न

Sun Aug 11 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- स्थानिक नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी-नागपूर महामार्गावरील एका नामवन्त बिअर बार मध्ये समोरील टेबल वर बसलेला एक इसम हा आपल्या मित्रांसोबत बसला असता अचानक त्याला फोन आला व तो मोबाईल वर जोराने बोलू लागला यावर आरोपीने जोराने बोलण्यास मज्जाव केल्याने दोघात झालेला शाब्दिक वाद हा विकोपाला जाऊन हाणामारीत झाला व आरोपीने त्याला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com