यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करीयर सेंटर विद्यार्थी विकास विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आणि श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन दि. २९ मार्च श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयात करण्यात आले आहे.
सदर मेळाव्याकरीता एकुण ४२४ रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. त्यात ईसाफ स्मॉल फायनन्स बॅंक, सहयोग मल्टीस्टेट क्रेडीट को. ऑप सोसायटी, इंदुजा महिला मिल्क प्रोड्युस लि. कंपणी, रतन असोसिएटस, मॅक व्हेईकला प्रा. लि., राजवी होंडा, चैतन्य फायनन्स इत्यादी कंपणी, उद्योजक सहभागी होणार आहे. मेळाव्यात १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदविधर तसेच व्यवसायीक अभ्यासक्रम पुर्ण केलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.
उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अप्लाय करून दि.२९ मार्च रोजी श्रीमती नानकीबाई वाचवाणी कला महाविद्यालय, धामगाव रोड, यवतमाळ येथे प्रत्यक्ष स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा, पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे व संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प.भ. जाधव व श्रीमती नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत चतुर यांनी केले आहे.