पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

यवतमाळ :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करीयर सेंटर व विद्याभवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्चच्या संयुक्त विद्यमाने दि.25 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता विद्याभवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च यवतमाळ येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

या मेळाव्याकरीता एकुण 486 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. त्यापैकी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेकरीता 130 रिक्तपदे प्राप्त झालेली आहे. ईकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लि. नागपूर, विनय टिव्हीएस, यवतमाळ, एसबिआय लाईफ इन्सुरन्स, यवतमाळ, इंदुजा महिला मिल्क प्रोड्युसर कंपनी लि. यवतमाळ, उत्कर्ष स्मॉल फायनन्स बँक, यवतमाळ, सारा स्पिंटेक्स प्रा. लि. यवतमाळ, रेमण्ड युको डेनिम प्रा. लि. यवतमाळ, दि यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लि. यवतमाळ ईत्यादी कंपनी, उद्योजक सहभागी होणार आहे.

या सर्व कंपनी, उद्योजकांमार्फत १२ वी पास, आयटीआय, पदविका, पदविधर तसेच व्यवसायीक अभ्यासक्रम पुर्ण केलेले ईच्छुक उमेदवारांना रोजगाराच्या संधीचा लाभ घेता येणार आहे. उमेदवारांनी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता विभागाच्या rojgar.mahaswayam.gov.in तसेच cmykpy.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करून दि. 25 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष विद्याभवन कॉलेज ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च, यवतमाळ येथे स्वखर्चाने मुलाखती करीता आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे, स्वत:चा रिझ्युम, बायोडाटा पासपोर्ट फोटोसह उपस्थित रहावे व संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त प.भ. जाधव यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

उष्माघातापासून नागरिकांना मिळणार दिलासा

Wed Feb 19 , 2025
– बाजारपेठ, वर्दळीच्या ठिकाणी उपाययोजना करण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश नागपूर :- वाढता उष्मा आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यावर उपाय म्हणून नागपूर महानगरपालिकेतर्फे दरवर्षी उन्हाळ्यात उष्णतेपासून नागरिकांना दिलासा मिळावा याकरिता विविध उपायायोजना केल्या जातात. या नियोजनासंदर्भात अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांनी मंगळवारी (ता. १८) उष्माघात प्रतिबंध व नियंत्रण कार्यक्रमाची अंमलबजावणीबाबत आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्तांच्या सभाकक्षात आयोजित बैठकीत उपायुक्त विजय […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!