संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- एस.के. पोरवाल महाविद्यालय, कामठी येथे दिनांक 9 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी10.00 वाजता मेरी माटी मेरा देश या केंद्र सरकारच्या उपक्रमांतर्गत पंचप्राण प्रतिज्ञा शपथ कार्यक्रम घेण्यात आला होता. ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. विनोद शेंडे यांनी केले. तर ही शपथ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. विनय चव्हाण यांनी दिली. या शपथेच्या माध्यमातून भारताची अखंडता आणि एकता अबाधित राहावी याविषयीचे मार्गदर्शन प्राचार्य महोदय यांनी केले. या कार्यक्रमाला प्रामुख्याने महाविद्यालयाच्या उप प्राचार्या डॉ. रेणू तिवारी आणि उपप्राचार्य डॉ. मनिष चक्रवर्ती कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.सुधीर अग्रवाल, कनिष्ठ महाविद्यालयाचे सुपरवायझर विश्वनाथ वंजारी, लेडी ऑफिसर डॉ.निशिता अंबादे हे प्रामुख्याने उपस्थित होते. आपल्या मनोगतामध्ये डॉ. सुधीर अग्रवाल यांनी मेरी माटी मेरा देश या उपक्रमाच्या अंतर्गत केंद्र सरकारचे काय धोरण आहे.याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन लेडी ऑफिसर डॉ. निशिता अंबादे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक विद्यार्थी आणि शिक्षकेत्तर कर्मचारी आवर्जून उपस्थित होते.