पालीभाषा तळागाळात पोहोचावी – डॉ संजय दुधे 

नागपूर :-पाली भाषा ही भारताची प्राचीन भाषा आहे. या भाषेत भगवान बुद्धांनी आपला उपदेश दिला. तो उपदेश सम्राट अशोकाने संपूर्ण जगात पोहोचविला. ही भाषा मानवाला शील, सदाचार शिकविणारी आहे. पालीभाषा ही सर्वांनी तळागाळात पोहोचविली पाहिजे असे मत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजय दुधे यांनी व्यक्त केले. ते पाली प्राकृत आणि बौद्ध अध्ययन केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सहा दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये अध्यक्षस्थानी बोलत होते.

पुढे बोलतांना डॉ. संजय दुधे यांनी विदेशातील बौद्ध अभ्यासकांना नागपूर विद्यापीठात पाली व बौद्ध अध्ययनाचे संशोधनात्मक उच्च शिक्षण घेता यावे यासाठी नागपूर विद्यापीठाच्या माध्यमातून त्यांची व्यवस्था करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असेही मत व्यक्त केले. याप्रसंगी त्यांच्या हस्ते महाकश्यप महास्थवीर विपश्यना केंद्र व डॉ भदंत आनंद कौशल्यायन ज्ञानस्त्रोत केंद्र चे उद्घाटन करण्यात आले.

या राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन पाली विभूषण डॉ भालचंद्र खांडेकर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रो डॉ नीरज बोधी यांनी, संचालन प्रा सरोज वाणी ह्यांनी तर समारोप प्रा डॉ सुजित वनकर यांनी केला. पाहुण्यांचे स्वागत डॉ तुळसा डोंगरे, डॉ ज्वाला डोहाने, डॉ रोमा शिंगाडे, उत्तम शेवडे यांनी केले.

कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठ गीताने झाली. उद्घाटनानंतर पुण्यातील अभिमत विद्यापिठाच्या डेक्कन कॉलेजचे विभाग प्रमुख डॉ श्रीकांत गणवीर यांनी बौद्ध लेणी स्थापत्य यावर प्रामुख्याने मार्गदर्शन केले. श्रीकांत गणवीर हे आरकालॉजी विभागातील तज्ञ व अभ्यासक असून ते याच विषयावर 16 मार्चपर्यंत दररोज 12 ते 3 या वेळेत मार्गदर्शन करणार आहेत.

या कार्यशाळेच्या निमित्ताने विभागातील विद्यार्थ्यांच्या वतीने स्वतः जवळील ऐतिहासिक व दुर्मिळ पुस्तकांची प्रदर्शनी आयोजित करण्यात आली आहे. अभ्यासकांना तेथील ऐतिहासिक पुस्तके पाहता व चाळता येतील.

डॉ. तलत प्रवीण, पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे ह्या 16 पासून 18 मार्च पर्यंत मार्गदर्शन करतील.

समारोपीय सत्राचे अतिथी डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, रा तु म नागपूर विद्यापीठ, नागपूर हे राहतील.

कार्यशाळेला आजी-माजी विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विभाग प्रमुख डॉ. नीरज बोधी ह्यांनी केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सहकार क्षेत्रात होतकरू विद्यार्थ्यांना विविध नोकरीच्या संधीसाठी पोरवाल महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे कार्यशाळा संपन्न 

Tue Mar 14 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- सेठ केसरीमल पोरवाल महाविद्यालय कामठी येथे डीजी इन्स्टिट्यूट ऑफ को-ऑपरेटिव्ह मॅनेजमेंट गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे डायरेक्टर डॉ. ए. राजा गोपाला राव आणि डॉ. प्रशांत शिर्के यांनी पोरवाल महाविद्यालयातील बी. ए.,बी.कॉम. बी.एस्सीच्या विद्यार्थ्यांना सहकार क्षेत्रामध्ये विविध नोकरीच्या संधी कशा आहे. याबद्दल कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यक्रमाला डॉ. ईफ्तेखार हुसेन वाणिज्य विभाग प्रमुख,डॉ. तुषार चौधरी सहयोगी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!