संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- एखाद्या साधकाप्रमाणे राष्ट्र प्रेमाने भारावलेली व्यक्ती काय अचाट कामगिरी करू शकते, प्रसंगी त्यागाची परिसीमा गाठू शकते. असे एक उदाहरण म्हणजे तेलंगाना येथील रमागुंडन गावचा 43 वर्षीय मोहम्मद मारुफ मोहम्मद मशीहुलजमा हा होय. 15 ऑगस्ट पासून आपल्या सायकलवरून तेलंगाना ते बिहार असा सायकल प्रवासाची सुरुवात करत जवळपास 800 किलो मीटरचा प्रवास पूर्ण करण्याचा निर्धार केला. मोहम्मद मारुफ राष्ट्र प्रेमाने भारावलेला. त्यानी अशाच एका साहसी मोहिमेची आखणी करत भारतभर प्रवास करण्याचे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवले. सायकल प्रवासाचा पहिला टप्पा म्हणून त्याने तेलंगाना ते बिहार असा प्रवास सुरू करण्याचा निर्धार केला आणि आपल्या जमा पुंजीतून सायकल वरून देशवासीयांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, ग्रामस्वच्छता,नशा मुक्त भारत असे बहु आयाम संदेश घेऊन प्रवास सुरू केला.
तेलंगाना च्या रमागुंडन येथून 15 ऑगस्ट ला त्यानी या प्रवासाला सुरुवात केली. तेलंगाना, महाराष्ट्र, एम. पी. यूपी बिहार असा जवळपास 800 किलो मीटरचा सायकल प्रवास करणार आहे. काल रात्री तो नागपुरात पोहचला. रात्र भर नागपूर येथील एल आय सी कार्यालयात राहून दुसऱ्या दिवशी रविवारला सकाळी कामठी येथे पोहचला. तो कामठी येथे पोहचताच येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर परिसर सौंदर्यीकरण समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्याचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी त्याने सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून देशवासीयांमध्ये स्वाभिमान जागवण्यासाठी, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी, ग्रामस्वच्छता,नशा मुक्त भारत असे बहु आयाम संदेश घेऊन सायकल भ्रमण करण्याचा विचार मनात बाळगून होतो. गेल्या 15 ऑगस्ट पासून हा प्रवास सुरू करण्याचा निर्धार केला आणि निघालो. तेलंगाना राज्यातील रमाकुंडन या गावातून सकाळी 8 वाजता पासून हा प्रवास सुरू केला. महिन्या भरा पेक्षाही अधिक काळ लागणाऱ्या या प्रवासात सकाळ पासून रात्र होत पर्यंत जवळपास 100 किलो मीटरचा प्रवास करून रात्री मिळेल त्या जागी आराम करत दुसऱ्या दिवशी सकाळ पासून पुन्हा आपल्या प्रवासाला सुरुवात करत असतो.
वाटेत अनेक लोक मला भेटत होती. सायकलवर लागलेल्या राष्ट्रीय ध्वजाला बघून सगळे विचारणा करत होते. सकाळी पाच वाजता पासून मी प्रवासाला सुरुवात करून रात्री सात ते आठ वाजेपर्यंत सायकलिंग करत होतो. देशातल्या मंदिर, गुरुद्वारा, बस स्थानके किंव्हा इतर ठिकाण हे माझ्या निवासाचे स्थान होते. मात्र काही ठिकाणी लोकांच्या प्रेमामुळे व आग्रहामुळे मला अनेकांनी सहकार्य केले. काही संघटनांनी सायकल चे टायर ट्युब पण त्याचा हा प्रवास सुखरूप व्हावा म्हणून घेऊन दिले.
पावसामुळे सायकल प्रवासात खंड पडू नये म्हणून त्याने आपल्या सोबत रेनकोट आणि हेल्मेट सुद्धा घेतले आहे. त्यामुळे पावसात सुद्धा त्याचा हा प्रवास न थांबता सुरू आहे.
कामठी येथील मोटर स्टँड चौकात पोहचल्यावर डॉ बाबासाहेब आंबेडकर सौंदर्यीकरण परिसर समिती चे पदाधिकारी तसेच आदींनी त्याला जेऊ घालून व त्याचा पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी कोमल लेंढारे, राजेश गजभिये,विकास रंगारी, प्रमोद खोब्रागडे,आशिष मेश्राम,राजन मेश्राम,बसपा पदाधिकारी नागसेन गजभिये तसेच जेता फुले,अनिल पाटील, किशोर दिपानी, सुनील थुले, आबिद अली, गोलू पैगवार, आदी उपस्थित होते.