बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांना (OPD Clinic) मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात जितके बाह्य रुग्ण तपासणी केंद्र (OPD Clinic) कार्यरत आहेत त्यांना मनपाकडे नोंदणी करणे बंधनकारक असुन या तपासणी केंद्रांची नोंदणी लवकरात लवकर करण्याच्या सूचना  जिल्हाधिकारी यांनी दिल्या आहेत. यासंबंधी आढावा बैठक  जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली १० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजीत करण्यात आली होती.

शहरात ॲलोपॅथी,होमिओपॅथी,आयुर्वेद,युनानी,डेंटल पद्धतीने उपचार देणारे अनेक बाह्य रुग्ण तपासणी केंद्र (OPD Clinic) आहेत ज्यांनी मनपाकडे नोंदणी केलेली नाही. अश्या सर्व तपासणी केंद्रांना नोंदणीकृत करणे अनिवार्य असुन याकरीता मनपा आरोग्य विभागात संपर्क साधता येईल.

शहरातील सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणात जैव वैद्यकीय कचरा दरदिवशी निर्माण होतो. केंद्रात तयार होणाऱ्या जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट ही शास्त्रोक्त पद्धतीने लावणे ही त्या केंद्राची जबाबदारी असून शास्त्रोक्त पद्धतीने जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट न लावल्यास सदर केंद्रावर कारवाई करण्यात येणार आहे.

याप्रसंगी सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्रांना(OPD Clinic) महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडेही नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले. तरी मनपा हद्दीतील सर्व बाह्य रुग्ण तपासणी केंद्र यांनी मनपा तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे नोंदणी करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

विशेष लेख - रेशीम शेती, फायद्याची शेती…

Mon Apr 10 , 2023
पारंपरिक शेतीच्या तुलनेत रेशीम शेती उद्योग हा उत्पादन देणारा आहे. विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील मोहाडी परिसरात टसर आणि तुतीच्या रेशीम कापड आणि धाग्याची निर्मिती होते. टसर रेशीमच्या ‘करवती साडी’ चा इतिहास सुमारे 400 वर्षे जुना आहे. आंधळगाव येथील करवती साडी प्रसिध्द आहे. जिल्हा रेशीम कार्यालय, भंडारा अंतर्गत रेशीम मुलभूत सुविधा केंद्र, जमनी, टसर रेशीम केंद्र, निष्टी ता. पवनी व टसर रेशीम […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com