संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 4:-आझादी का अमृत महोत्सवा अंतर्गत कामठी पंचायत समिती कार्यालयात पंचायत समिती गटविकास अधिकारी, कर्मचारीगण, सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, यांचे हस्ते हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात हर घर तिरंगा अभियानाला सुरुवात करण्यात आली .
आज दि. 04/08/2022 ला पंचायत समिती कामठी येथे शासनाकडून प्राप्त तिरंगा झेंडे विक्री स्टॉल चे उदघाटन पंचायात समिती सभापती उमेश रडके यांच्याहस्ते फीत कापून तिरंगे झेंडे ग्रामपंचायतीस विक्री करणे सुरु केले. सदर कार्यक्रमास पंचायत समिती उपसभापती आशिष मल्लेवार, गट विकास अधिकारी अंशुजा गराटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय माने,पंचायत समिती सदस्य ,सविता जिचकार, दिशा चनकापुरे, सोनू कुथे , दिलीप वंजारी ,सुमेध रंगारी, सहायक गट विकास अधिकारी प्रदीप गायगोले व पंचायत समिती अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदर तिरंगा झेंडे हे ग्रामपंचायत गावातील नागरिकांना विक्री करणार असून गावातील नागरिकांना त्यांच्या घरी झेंडे लावण्यास प्रवृत्त करणार आहे. सन्मा,सभापती,उपसभापती, गट विकास अधिकारी व सर्व पंचायात समिती सदस्यां कडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सर्व नागरिकांनी घरो घरी तिरंगे लावून हर घर तिरंगा या मोहिमेत सहभाग घ्यावा.