आपली ओळख ही आपल्या कामातून होत असते-पोलीस निरीक्षक दीपक भिताडे..

संदीप कांबळे,विशेष प्रतिनिधी 

-जुनी कामठी पोलीस स्टेशन येथे निरोप समारंभ

कामठी ता प्र 30 :- सद्रक्षणाय-खलनिग्रहनाय हे ब्रीद बाळगून जनसामान्यांसाठी सदैव तत्पर असणारे पोलीस खाकी वर्दीतून आपली कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असतात ही कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असताना पोलिसांचे नागरी संबंध वृद्धीने वाढतात .आणि नागरिकांशी वाढलेला हाच जनसंपर्क कर्तव्यात मदतशीर ठरत असतो.काम करतेवेळी समस्या निर्माण होणारच तेव्हा या समस्यांना न घाबरता प्रत्यक्ष तोंड दिल्यास त्यातून मार्ग निघतात आणि समस्या मार्गी लागतात कारण समस्या ही मार्गी लागण्यासाठीच येत असतात.तसेच कर्तव्यदक्ष भूमिका बजावत असता पोलीस खात्यात तसेच नागरिकांत आपली ओळख ही आपल्या कामातून होत असल्याचे मौलिक प्रतिपादन जुनी कामठी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांनी केले.

आज जुनी कामठी पोलीस पोलीस स्टेशन येथे आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमात बोलत होते दरम्यान गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांनी समयोचित असे मार्गदर्शन केले.जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक केरबा उर्फ आकाश माकने यांची औरंगाबाद तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे यांची नवीन कामठी पोलीस स्टेशनला कार्यालयीन बदली झाल्याने या दोन्ही सत्कार मूर्तींना आज जुनी कामठी पोलीस स्टेशन च्या वतीने आयोजित निरोप समारंभ कार्यक्रमातून भावपूर्ण निरोप देत उज्वल भविष्याच्या शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी या दोन्ही सत्कार मूर्तींचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे तसेच गुन्हे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी सत्कार मूर्तींनी नोकरी काळातील आपला अनुभव विषद केला.या निरोप समारंभाला पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी वर्ग,नागरिक गण उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन धर्मेंद्र राऊत तर आभार क्षीरसागर यांनी मानले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

प्रभाग क्र 1 च्या विविध समस्या संदर्भात युवक कांग्रेसचे मुख्याधिकाऱ्यांना सामूहिक निवेदन..

Sun Jul 30 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 30 :- कामठी नगर परिषद मध्ये प्रशासकराज सुरू असून प्रभाग क्र 1 हा विविध समस्यांनी ग्रस्त असून या समस्यामुळे नागरिकांचे नाकी नऊ आले आहे तेव्हा प्रभाग क्र 1 अंतर्गत कोलसाटाल,नया बाजार,खान सहाब का बगीचा आदी भागातील नागरी समस्या मार्गी लावण्या संदर्भात कामठी मौदा विधानसभाचे नेता व जिला परिषद नागपुर माजी अध्यक्ष सुरेश भोयर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com