आमचे सरकार मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यासोबतच, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास कटिबद्ध : पंतप्रधान

नवी दिल्ली :- मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारण्यावर भर देत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र निर्माण करण्यास आमचे सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनानिमित्त केंद्रीय पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री परशोत्तम रुपाला यांच्या ट्विटचा प्रतिसाद देत पंतप्रधानांनी ट्विट केले:

“अधिक कर्जपुरवठा, उत्तम बाजारपेठ अशा उपाययोजनांतून मत्स्योत्पादकांचे जीवनमान सुधारत, एक गतिमान मत्स्यव्यवसाय क्षेत्र विकसित करण्यासाठी आमचे सरकार कार्य करत राहील.”

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

धुळे-इंदूर रेल्वे मार्ग लवकर पूर्ण करणार, सुलवाडे-जामफळ योजनेच्या कामास निधी कमी पडू देणार नाही - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Tue Jul 11 , 2023
– धुळे जिल्ह्याच्या विकासासाठी शासन कटिबद्ध – उपमुख्यमंत्री अजित पवार धुळे :- जिल्ह्याला सुजलाम सुफलाम बनविणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कनोली उपसा सिंचन योजनेच्या कामासह धुळे शहराच्या विकास कामांना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. धुळे-इंदूर रेल्वे मार्गाचे भूसंपादनाचे काम जलदगतीने सुरू असून हा रेल्वे मार्गही लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. येथील एसआरपीएफ मैदानावर ‘शासन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com